मुंबई - Dunki Box Office Collection : अभिनेता शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र आता चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी ही कमी पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 'जवान' आणि 'पठाण'प्रमाणे रुपेरी पडद्यावर कमाई करू शकलेला नाही. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 29 कोटीहून अधिक कमाई केली. दरम्यान 'डंकी'च्या सातव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे.
'डंकी' चित्रपटानं केली 'इतकी कमाई : दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी 'डंकी' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजच्या 7 व्या दिवशीही 'डंकी'च्या कमाईत घट झाली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथा दिवशी 30.7 कोटी, पाचवा दिवशी 24.32 कोटी, सहावा दिवशी 11.56 कोटी आणि सातव्या दिवशी 9.75 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटानं एकूण 151.26 कोटी रुपेरी पडद्यावर कमाई केली आहे. 'डंकी' चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू , विकी कौशल , बोमन इराणी, सतीश शाह आणि इतर कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटाची कहाणी चार मित्रांवर आधारित आहे, ज्यांना परदेशात जायचं आहे. हा 'डंकी' सध्या साऊथ अभिनेता प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाशी संघर्ष रुपेरी पडद्यावर करताना दिसत आहे.
'डंकी'ची एकूण कमाई
पहिला गुरुवार पहिला दिवस - 29.2 कोटी
पहिला शुक्रवार दुसरा दिवस - 20.12 कोटी
पहिला शनिवार तिसरा दिवस - 25.61 कोटी
पहिला रविवार चौथा दिवस - 30.7 कोटी
पहिला सोमवार पाचवा दिवस - 24.32 कोटी
पहिला मंगळवार सहावा दिवस - 11.56 कोटी
पहिला बुधवार सातवा दिवस 9.75 कोटी
एकूण कलेक्शन - 151.26 कोटी
हेही वाचा :