मुंबई - Dunki Box Office Collection Day 13: हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 वर्ष हे खूप उत्तम होतं. या वर्षात अनेक चित्रपटांनी रुपेरी पडद्यावर धमाल केली. आता नवीन वर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. दरम्यान या वर्षात देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चित्रपट दाखल होणार आहेत. 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झालेल्या शाहरुख खान आणि तापसी पन्नू स्टारर 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना सध्या दिसत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटासाठी दुसरा वीकेंड चांगला होता. 'डंकी'नं जगभरातील 380 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'डंकी' आज देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज झाला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'डंकी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटीचं कलेक्शन केलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथा दिवशी 30.7 कोटी, पाचवा दिवशी 24.32 कोटी, सहावा दिवशी 11.56 कोटी, सातव्या दिवशी 10.5 कोटी, आठव्या दिवशी 8.21 कोटी, नवव्या दिवशी 7.25 कोटी, दहाव्या दिवशी 9 कोटी,अकराव्या दिवशी 11.5 कोटी आणि बाराव्या दिवशी 9.25 कोटीची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 196.97 कोटीची कमाई केली आहे. आता 'डंकी' रिलीजच्या तेराव्या दिवसात आहे. तेराव्या दिवशी हा चित्रपट प्रचंड कमाई करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. 'डंकी' बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'सालार' चित्रपटाशी झुंज करत आहे.
'डंकी'ची एकूण कमाई
पहिला दिवस: - 29.2 कोटी
पहिला शुक्रवार दुसरा दिवस - 20.12 कोटी
पहिला शनिवार तिसरा दिवस - 25.61 कोटी
पहिला रविवार चौथा दिवस - 30.7 कोटी
पहिला सोमवार पाचवा दिवस - 24.32 कोटी
पहिला मंगळवार सहावा दिवस - 11.56 कोटी
पहिला बुधवार सातवा दिवस- 10.5 कोटी
दुसरा गुरुवार आठवा दिवस- 8.21 कोटी
दुसरा शुक्रवार नव्वा दिवस - 7.25 कोटी
दुसरा शनिवार दहावा दिवस - 9 कोटी
दुसरा रविवार अकरावा दिवस - 12 कोटी
दुसरा सोमवारी बारावा दिवस 9.25 कोटी
एकूण कलेक्शन - 196.97
हेही वाचा :