ETV Bharat / entertainment

Dubai tour for Rakhi Sawat : राखी सावंतची दुबईत डान्स अकॅडमी सुरू, मिळाले घर आणि गाडी

राखी सावंतने दुबईत डान्स अकॅडमी सुरू केल्यानंतर मुंबईला परतली आहे. पापाराझींशी बोलताना तिने आपल्याला दुबईत घर आणि गाडी मिळाल्याचे सांगितले.

Dubai tour for Rakhi Sawat
राखी सावंतची दुबईत डान्स अकॅडमी सुरू
author img

By

Published : Mar 7, 2023, 12:11 PM IST

मुंबई - राखी सावंत सोमवारी रात्री दुबईहून परतली आहे. मुंबई विमानतळावर ती स्पॉट झाली. राखीने दुबईमध्ये डान्स अकॅडमी सुरू केली आहे. यासंबंधी ती विमानतळावर पापाराझींशी बोलताना दुबईत घर आणि कार मिळाल्याचे सांगितले. आपल्या कंपनीने तिला ही सुविधा दिल्याचे तिने सांगितले.

मुंबई विमानतळावर येताच नेहमी प्रमाणे ती पापाराझींच्या भेटीसाठी थांबली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी तिने आदिल खानसोबत ती याच ठिकाणी पूर्वी आली होती तेव्हा तिने त्याच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत स्वागत केले होते त्याची आठवण काढली. ही आठवण सांगताना ती खूप भावूक झाली होती. ती म्हणाली, 'आदिल के सर पर फूल डाले थे मैने, आपको याद आ रहा है, उसका स्वागत किया था. और उसने अपनी गर्लफ्रेंड को बोला की नाटक है,'असे ससांगताना तिला हुंदका आला.

राखीने पुढे आईची आठवणही काढली. तिच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. आईच्या उपचारार्थ तिने भरपूर खर्च केला. मात्र ती वाचू शकली नाही. आईला घेऊन यापूर्वी दुबईला गेले होते. तिला दुबई फिरुन दाखवली होती हे सांगताना राखीच्या डोळ्यात पाणी आले. राखी बोलत असताना विमानतळावरील सहप्रवासी आणि बघे यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अशातच पापाराझींनी तिला होळीच्या शुभेच्छा द्यायला सांगितले. त्यावेळी सर्वांच्या जीवनात होळीचे रंग भरोत आणि आयुष्य रंगबिरंगी होवो, अशा शुभेच्छा दिलाया. मात्र स्वतःला दोष देत राखी म्हणाली, 'माझ्या आयुष्याचा रंग उडाला आहे.'

राखीने पती आदिल दुर्राणीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती, त्याने तिच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. राखीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. एका इराणी विद्यार्थिनीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर म्हैसूरमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता. राखीच्या आईचे जानेवारीमध्ये कर्करोगाने निधन झाले. तिच्या आईच्या मृत्यूच्या दिवशी तिला मारहाण केल्याचा आरोपही तिने केला होता.

हेही वाचा - Hema Malini Holi Track : बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी होळीच्या दिवशी रिलीज केली भक्तिगीते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.