ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 : ड्रीम गर्ल २'मध्ये कास्टिंग न झाल्याने नुसरत भरुचाचा तिळपापड... - अनन्या पांडे

आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल २'हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. यापूर्वी ड्रीम गर्लमध्ये नुसरत भरुचाने काम केले होते. मात्र आता तिच्या जागी अनन्या पांडेला घेण्यात आले आहे. यावर नुसरतने एक खुलासा केला आहे.

Dream Girl 2
ड्रीम गर्ल २
author img

By

Published : Aug 17, 2023, 5:59 PM IST

मुंबई : आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा या जोडीने 'ड्रीम गर्ल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती आणि हा चित्रपट २०१९ चा हिट चित्रपट होता. दरम्यान याचा पुढचा भाग 'ड्रीम गर्ल २' लवकरच रिलीज होणार आहे. पण सीक्वेलमध्ये नुसरतची जागा अभिनेत्री अनन्या पांडेने घेतली आहे. नुसरत भरुचाने आता 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाबद्दल एक खुलासा केला आहे. 'ड्रीम गर्ल २'मध्ये तिला न घेतल्याने तिचे मन दुखावले गेले आहे. याशिवाय तिने 'ड्रीम गर्ल' चित्रपटामधील तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

ड्रीम गर्ल २ मधून वगळल्यानंतर नुसरत भरुचाने तोडले मौन : नुसरत भरुचा 'ड्रीम गर्ल २'चा भाग नाही. तिने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाबाबत बोलताना तिने म्हटले आहे की, 'मी 'ड्रीम गर्ल'चा एक भाग होते आणि मला संपूर्ण टीम आवडते. मी त्यांच्यासोबत काम करतानाचे दिवस खूप मिस करते. पण त्यांनी मला 'ड्रीम गर्ल २'मध्ये का कास्ट केले नाही, या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. मला माहीत नाही या गोष्टीचा काय तर्क आहे, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मला या चित्रपटात का कास्ट केले नाही हे मला समजले नाही. मी देखील एक माणूस आहे, मला कळवले नाही याचे दु:ख मला देखील झाले आहे. हे अन्यायकारक आहे. पण हा त्यांचा निर्णय आहे. छान, हरकत नाही.' असे तिने यादरम्यान म्हटले.

'ड्रीम गर्ल २' सोबत नुसरतचा 'अकेली' चित्रपट प्रदर्शित होणार : नुसरतचा आगामी चित्रपट 'अकेली' देखील 'ड्रीम गर्ल २' सोबतच थिएटरमध्ये दाखल होत आहे. यावर, तिने म्हटले आहे की, 'मला माहीत नव्हते की माझा चित्रपट 'ड्रीम गर्ल २' सोबत रिलीज होणार आहे. खरे तर माझा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता, परंतु काही समस्यांमुळे आम्ही या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे.

नुसरतने 'ड्रीम गर्ल २' चा ट्रेलर पाहिला का : नुसरतला असेही विचारण्यात आले की तिने 'ड्रीम गर्ल २' चा ट्रेलर पाहिला आहे का, ज्यावर नुसरतने खिल्ली उडवत सांगितले, 'मी ट्रेलर पाहिला आहे आणि मला ट्रेलर चांगला वाटला, मला आशा आहे की आयुष्मानसाठी, अनन्यासाठी, राज सरांसाठी आणि प्रत्येकासाठी हा चित्रपट खरोखर चांगले काम करेल.

हेही वाचा :

  1. Akshay kumar upcoming movies 2024 : अक्षय कुमारचे आगामी चित्रपट लवकरच येणार रूपेरी पडद्यावर...
  2. Urfi Javed receives death threats : उर्फी जावेदला मिळाली जीवे मारण्याची धमकी...
  3. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभू 'खुशी'च्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान झाली भावूक...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.