ETV Bharat / entertainment

Dr. Amol Kolhe : डॉ.अमोल कोल्हे दिसणार ‘विठ्ठल विठ्ठला' या धार्मिक चित्रपटात! - डॉ. अमोल कोल्हे

राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते आता विठ्ठला विठ्ठला या धार्मिक चित्रपटात दिसतील.

Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhe
author img

By

Published : Apr 14, 2022, 5:09 PM IST

मुंबई - इंटरनेटच्या प्रसारानंतर जग लोकांच्या मुठीत आलं. त्यातच ‘टेक सॅव्ही’ तरुणाई भारताबाहेरील घडामोडींच्या संपर्कात आली. नाही म्हटलं तर आपल्याला पाश्चात्य देशांचं, त्यांच्या राहणीमानाचं अप्रूप असतेच, तरुणाईमध्ये काकणभर जास्तच. परंतु त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो हे त्यांना समजत नाही आणि अनेक आयुष्ये उध्वस्त झालेली पाहायला मिळतात. अशाच प्रकारच्या समस्येवर भाष्य करणारा चित्रपट येऊ घातलाय ज्याचं नाव आहे, ‘विठ्ठल विठ्ठला'.

राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. अनेक अनेक ऐतिहासिक चित्रपटांनंतर डॉ अमोल कोल्हे आता दिसणार आहेत एका धार्मिक चित्रपटात, म्हणजेच ‘विठ्ठल विठ्ठला' या चित्रपटात. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय जयंत गिलाटर यांनी.

अमोल कोल्हे गिलाटकर एकत्र करणार काम

‘रणभूमी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर एकत्र काम करत आहेत. याआधी बॉलिवूड चित्रपट चॉक अँड डस्टर, नटसम्राट या चित्रपटाचा गुजराती रिमेक, गुजरात११ तसेच सुपरहिट चित्रपट हल्की फुलकी इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर यांनी केले आहे. जयंत गिलाटर यांच्या मते 'विठ्ठल विठ्ठला' हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
हेही वाचा - रणबीर आलिया विवाह: हळदीनंतर कुटुंबीयांनी केली विवाह सोहळ्याची जोरदार तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.