मुंबई - सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी स्टारर डबल एक्सएलच्या निर्मात्यांनी बुधवारी चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. व्हिडिओमध्ये, आपण सोनाक्षी आणि हुमा जास्त वजनाच्या स्टिरिओटाइपवर विनोदी पद्धतीने प्रश्न उपस्थित करताना आपण पाहू शकतो. हा चित्रपट महिलांच्या शरीरासंबंधी असलेल्या जुनाट विचारांवर प्रहार करताना दिसतो. स्वप्न पाहणाऱ्या दोन वजनदार मुलींची ही कथा नेहमीपेक्षा वेगळ्या वळणाची आहे. स्वतःच्या जाडपणावर सकारात्मकरित्या मात करत यशासाठी धडपडणाऱ्या मुलींची एक मिश्कील कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
हुमा आणि सोनाक्षी या दोन्ही अभिनेत्रीनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रवासादरम्यान स्वत: ला उत्तम सिध्द केले आहे. आता त्या दोघी डबल एक्सएलमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात झहीर इक्बाल, महत राघवेंद्र आणि इतरही प्रमुख भूमिकेत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आगामी सोशल कॉमेडी चित्रपटाचे लेखन मुदस्सर अझीझ यांनी केले असून दिग्दर्शन सतराम रमानी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती टी सिरीज, वकाऊ फिल्म्स आणि इलेमन ३ एंटरटेन्मेंनी केली आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटातून सोनाक्षी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बाल पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. सोनाक्षीचा कथित लव्हबर्ड्स अलीकडेच गायक एमी विर्क आणि असीस कौर यांच्या सिंगल ब्लॉकबस्टरमध्ये दिसला होता.
हेही वाचा - सावरकर बायोपिकमध्ये रणदीप हुडासोबत झळकणार अंकिता लोखंडे