मुंबई - Rashmika Mandanna and Zara Patel : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या मार्फ व्हिडिओवरून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या व्हिडिओवर अनेकजण टीका करताना दिसत होते. दरम्यान यानंतर रश्मिकाला तिच्या चाहत्यांसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि साऊथ स्टार्सकडूनही पाठिंबा मिळत आहे. रश्मिकाच्या व्हायरल मार्फ व्हिडिओवर झारा पटेलनं प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओमध्ये झारा पटेल काळ्या कपड्यात लिफ्टच्या बाहेर येताना दिसत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला असून झाराच्या जागी रश्मिकाचा चेहरा जोडाला गेला होता. त्यानंतर या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर झारा पटेलनं मौन तोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
झारा पटेलनं डीपफेक व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया : झारा पटेलनं रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओवर प्रतिक्रिया देत, तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं लिहलं, 'हाय ऑल, एक केस माझ्या निदर्शनास आली आहे, ज्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्रीचा चेहरा वापरण्यात आला आहे. या डीपफेक व्हिडिओमध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, मी दुःखी आणि काळजीत आहे. मला महिलेचे भविष्यबद्दल काळजी वाटते की त्या सोशल मीडियावर सुरक्षित नाहीत. कृपया, एक पाऊल पुढं घ्या आणि तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेल्या प्रत्येक गोष्टीची वस्तुस्थिती तपासा, इंटरनेटवरील प्रत्येक गोष्ट खरी नसते'. यावर तिनं एक नाराज होतानाचा इमेजी पोस्ट केला आहे.
स्टार्सनी दिला रश्मिकाला पाठिंबा : अमिताभ बच्चन यांनी रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ शेअर करून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर मृणाल ठाकूर, नागा चैतन्य यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनी या प्रकरणात रश्मिकाला पाठिंबा दिला. यानंतर रश्मिकानं बिग बींसह सर्व स्टार्स तसेच तिच्या चाहत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानलं. यापूर्वी असे अनेक व्हिडिओ बनविण्यात आले आहेत, ज्यामध्ये कोणाचा चेहरा आणि कोणाची बॉडी वापरून मार्फ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले गेले होते.
हेही वाचा :