ETV Bharat / entertainment

Disha Parmar Vaidya : दिशा परमारने शेअर केला बेबी बंप फ्लॉंट करताचा फोटो... - दिशा परमारचा बेबी बंप

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या तिच्या गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

Disha Parmar Vaidya
दिशा परमार वैद्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 3:43 PM IST

मुंबई : 'बडे अच्छे लगते हैं २' या मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परमार लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. यात तिचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोमध्ये दिशाने तिचे टॉप वर करून पोट दाखविले आहे. दिशा परमारचा हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिशाच्या पोटावर काढलेला टॅटूही खूप खास आहे. हा फोटो शेअर करताना दिशा परमारने कॅप्शनमध्ये, 'गेटींग देअर.' असे लिहिले आहे. दिशाने काही महिन्यांपूर्वीच तिच्या गरोदरपणाबद्दल खुलासा केला होता.

दिशाचे टॅटू : दिशा परमारने पोट दाखवताच लोकांच्या नजरा तिच्या पोटावरील टॅटूवर पडल्या आहेत. दिशाने राहुलच्या नावाने हा टॅटू बनवला असून, त्याकडे लोकांचे लक्ष लगेच जात आहे. दिशाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. दिशाच्या येणाऱ्या बाळाबद्दल अनेक चाहत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी 'बेबी बॉय' तर काहींनी दिशाला 'बेबी गर्ल' असं म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत 'तुमच्या घरी मुलगा येतोय' असे लिहिले. आणखी दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे. 'तुमच्या कुटुंबात मुलगी येणार आहे मॅडम.'अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.

राहुल वैद्यने दिली प्रतिक्रिया : दिशाने हा फोटो शेअर करताच पती राहुल वैद्यने या पोस्टवर लिहिले, 'माय बेबीज.' यासोबतच त्याने हार्ट आयकॉनही शेअर केला आहे. राहुल वैद्य आणि दिशा यांचे लग्न जुलै २०२१ मध्ये झाले होते. राहुलने 'बिग बॉस'मध्ये दिशाबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते आणि दिशानेही शोमध्ये पाहुणी म्हणून एन्ट्री करून हे प्रेम स्वीकारले होते. लग्नाच्या २ वर्षानंतर हे दोघे पालक होणार आहेत. दिशा अनेकदा बेबीबंप फ्लॉंट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय सेलिब्रिटीही या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव करत तिला काळजी घेण्यास सांगत आहेत.

हेही वाचा :

  1. Jailer Box Office Collection Day 13 : रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट लवकरच ३०० कोटीच्या क्लबमध्ये करणार एंट्री...
  2. Rakhi Sawant And Adil Khan : आईबाबत बोलणाऱ्या आदिल खान दुर्रानीवर राखी भडकली, म्हणाली...
  3. Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाची नवीन 'पूजा' कशी असणार? 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.