मुंबई : उडता पंजाब, सूरमा आणि इतर यासारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ, तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन यांच्या भूमिका असलेल्या 'द क्रू' या चित्रपटातील कलाकारांमध्ये सामील होणार आहे. हा चित्रपट एक कॉमेडी ऑफ एरर्स आहे. जो संघर्ष करीत असलेल्या एअरलाइन इंडस्ट्रीमध्ये मांडला आहे. 'उडता पंजाब' आणि 'गुड न्यूज'नंतर दिलजीत आणि करिनाची ही तिसरी जोडी असेल.
दिलजीतच्या चित्रपटातील कामविषयी बोलताना रिया कपूर : प्रोजेक्टमध्ये दिलजीतच्या प्रवेशाबद्दल बोलताना निर्माती रिया कपूर म्हणाली, "दिलजीतच्या दर्जेदार प्रोजेक्ट्सकडे लक्ष देऊन कलाकारांमध्ये सामील झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. त्याच्या चित्रपटाला नेहमीच एक खास नशीब लाभले आहे. हे तुम्ही यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही मनोरंजनासारखे नाही. कलाकार आणि मी प्रेक्षकांना एक रोमांचक आणि संस्मरणीय सिनेमा अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत."
-
‘THE CREW’: DILJIT DOSANJH JOINS TABU - KAREENA - KRITI SANON… #DiljitDosanjh is the latest addition to the cast of #TheCrew, starring #Tabu, #KareenaKapoorKhan and #KritiSanon… Set against the backdrop of airline industry… Starts March-end 2023. pic.twitter.com/1DUSxVdHLi
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">‘THE CREW’: DILJIT DOSANJH JOINS TABU - KAREENA - KRITI SANON… #DiljitDosanjh is the latest addition to the cast of #TheCrew, starring #Tabu, #KareenaKapoorKhan and #KritiSanon… Set against the backdrop of airline industry… Starts March-end 2023. pic.twitter.com/1DUSxVdHLi
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2023‘THE CREW’: DILJIT DOSANJH JOINS TABU - KAREENA - KRITI SANON… #DiljitDosanjh is the latest addition to the cast of #TheCrew, starring #Tabu, #KareenaKapoorKhan and #KritiSanon… Set against the backdrop of airline industry… Starts March-end 2023. pic.twitter.com/1DUSxVdHLi
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2023
चित्रपट तीन स्त्रियांची कथा : ही कथा तीन स्त्रियांची आहे, जी काम करतात आणि जीवनात पुढे जाण्याची धडपड करतात. परंतु, ते पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांचे नशीब त्यांना काही अनपेक्षित आणि अनुचित परिस्थितींकडे घेऊन जाते. ज्यामुळे ते खोट्याच्या जाळ्यात अडकतात. राजेश कृष्णन दिग्दर्शित आणि बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड आणि अनिल कपूर प्रॉडक्शन द्वारे सह-निर्मित हा चित्रपट मार्च 2023 च्या अखेरीस फ्लोरवर जाणार आहे.
'चमकिला'मध्येदेखील दिसणार : क्रू बाजूला, दिलजीत इम्तियाज अलीच्या आगामी संगीतमय चित्रपट 'चमकिला'मध्येदेखील दिसणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट अमरजोत कौर आणि अमर सिंग चमकिला या दोन लोकप्रिय पंजाबी गायकांभोवती फिरतो. अमरजोतच्या भूमिकेत परिणीती चोप्रा दिसणार आहे. तर दिलजीत चमकीला या भूमिकेत दिसणार आहे. 8 मार्च 1988 रोजी चमकिला आणि त्यांच्या पत्नीची त्यांच्या संगीत बँडच्या सदस्यांसह हत्या करण्यात आली.
गुड न्यूजमध्ये होते सोबत : अभिनेता दलजीत दोसांझ, करिना कपूरमुख्य भूमिका असलेला 'गुड न्यूज' हा चित्रपट 2019 वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १७. ५० कोटीची दमदार ओपनिंग करुन चित्रपटाने यशाकडे वाटचाल केली होती. यामध्ये आता दुसऱ्या दिवशी यामध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २१ कोटीची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई ३९.५० कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे 'गुड न्यूज' हा यावर्षाचा शेवट गोड करणारा चित्रपट म्हणता येईल. आठवड्याच्या शेवटपर्यंत हा चित्रपट ५० कोटीची कमाई करेल, असा अंदाज समीक्षकांनी वर्तवला आहे.
हेही वाचा : SRK Gives Epic Reply : शाहरुखने पठाण विरोधकांना दिले उत्तर; वादाचे जागरूकपणे केले निराकरण