ETV Bharat / entertainment

'जय' अमिताभ बच्चनच्या बर्थडेला दोस्त 'वीरू' धर्मेंदने दिल्या अनोख्या शुभेच्छा - अमिताभ बच्चन ८० वा वाढदिवस

हिंदी चित्रपटसृष्टीतील हीमॅन धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त एक उत्तम पोस्ट शेअर केली असून बिग बींसाठी काही गोष्टीही सांगितल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 11, 2022, 3:05 PM IST

मुंबई - 70 च्या दशकातील 'शोले' चित्रपटातील 'जय-वीरू'ची जोडी विसरणे अशक्य आहे. 'जय-वीरू' (अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र) ही जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन होत आहे. अशा परिस्थितीत 'शोले' चित्रपटाचा सह-अभिनेता धर्मेंद्र यांनीही बिग बींच्या वाढदिवसानिमित्त एक उत्तम पोस्ट शेअर केली आहे.

शक्तीशाली अभिनेता धर्मेंद्र यांनी सर्वात प्रतिभावान स्टार अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आगामी 'उंचाई' चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धर्मेंद्र यांनी ट्विटरवर चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे. जयची भूमिका करणारे बिग बी निळ्या जीन्ससह लाल टी-शर्ट घातलेले दिसतात आणि वीरूची भूमिका करणारा धर्मेंद्र डेनिम जॅकेट आणि निळ्या जीन्ससह टी-शर्टमध्ये आहेत.

धर्मेंद्र यांची पोस्ट
धर्मेंद्र यांची पोस्ट

पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिले, 'अमित, तुझ्यावर प्रेम आहे. मला राजश्री प्रॉडक्शनकडून कळले की तू त्यांच्यासोबत चित्रपट करत आहेस. मस्त. सर्वात प्रतिभावान अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन हाऊस एकत्र. आपणास शुभेच्छा'.

बिग बी सध्या गुडबाय या चित्रपटात दिसत आहेत आणि त्यांचा आगामी चित्रपट 'उंचाई' आहे, जो 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या करत आहेत.

कपिल शर्मा, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि गोविंदा यांच्यासह अनेक स्टार्सनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. कपिल शर्माने KBC च्या मंचावरून एक फोटो शेअर केला आणि लिहिले, आदरणीय अमिताभ बच्चनजी, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्ही नेहमी आनंदी, निरोगी राहा आणि अशीच तुमची अप्रतिम प्रतिभा सर्वांचे मनोरंजन करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही आमचा अभिमान आहात, प्रेम आणि आदरासह.

तर तिकडे शिल्पाने बिग बींसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. गोविंदाने 'बडे मियाँ-छोटे मियाँ' चित्रपटाचा फोटो शेअर करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - Hbd अमिताभ बच्चन: ८० वर्षांचे झाल्याबद्दल बिग बींचे विचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.