ETV Bharat / entertainment

Dharmendra and Sunny deol : 'गदर २' च्या यशाचा जल्लोष, सनी देओल आणि धर्मेंद्रने मानले चाहत्यांचे आभार - Gadar 2

सनी देओलचे कुटुंब 'गदर २' चित्रपटाचे यश साजरे करत आहे. सनी आणि धर्मेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना धन्यवाद म्हटले आहे. याशिवाय 'गदर २' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरी भांगड्यावर जोरदार नाचताना गौरव चोप्रा दिसत आहे.

Dharmendra and Sunny deol
सनी देओल आणि धर्मेंद्र
author img

By

Published : Aug 14, 2023, 2:40 PM IST

मुंबई : सनी देओल स्टारर 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान आता 'गदर २' या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. याशिवाय आता सनी देओलच्या कुटुंबामधील सदस्य देखील खूप खुश आहे. २२ वर्षांपूर्वी ' गदर-एक प्रेम कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. दरम्यान आता 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवत आहे. ' गदर २' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत १०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. दरम्यान ' गदर २' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या घरी ढोल वाजविल्या जात आहे.

धर्मेंद्र आणि सनीने चाहत्यांचे आभार मानले : ' गदर २'च्या यशाबद्दल सनी देओल आणि याचे वडील धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सनी देओलने ' गदर २' च्या नावाने बनवलेल्या पुष्पगुच्छाचा फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना प्रेम व्यक्त केले आहे. दरम्यान या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी देखील सनीचे आणि ' गदर २'च्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय या पोस्टवर सनीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओलने लिहले, लव्ह यू माय तारा सिंग. तसेच या पोस्टवर वडील धर्मेंद्र यांनी लिहिले आहे, 'मित्रांनो, 'गदर २'ला अपार प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद, तुमच्या प्रेमामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला आहे.

'गदर २' च्या दिग्दर्शकाच्या घराबाहेर ढोल वाजले : 'गदर २' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या घरी चित्रपटाच्या यशाचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली असून येथे चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव चोप्रा भांगडा करताना दिसत आहे. हा चित्रपट लवकरच २०० कोटी कमाई बॉक्स ऑफिसवर करेल असे दिसत आहे. या चित्रपटाची गाणी आणि सनीचा जुना अंदाज चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. 'गदर २' या चित्रपटाचे यश खूप अद्भुत आहे. या चित्रपटाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 box office collection day 3 : 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन दिवसात ५० कोटीच्या जवळ पोहचले
  2. Jailer box office collection Day 4 : 'जेलर' चित्रपट चौथ्या दिवशी १५० कोटीच्या उंबरठ्यावर
  3. Gadar 2 box office collection day 3 : 'गदर २' पोहोचला १०० कोटींच्या पार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.