मुंबई - बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौतचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'धाकड'चा ट्रेलर शुक्रवारी (29 एप्रिल) रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती कंगनाने दिली होती. कंगनाचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. 'धाकड' हा चित्रपट यावर्षी 20 मे रोजी रिलीज होणार आहे. याआधी कंगनाने चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात अनेक पोस्टर चाहत्यांशी शेअर केले होते, त्यानंतर कंगनाचे चाहते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार या संभ्रमात होते.
चित्रपट निर्मात्यांनी जानेवारीमध्ये जाहीर केले होते की हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, परंतु कोरोनामुळे तारखा पुढे ढकलल्या गेल्या आणि आता चित्रपटाला रिलीजची तारीख मिळाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
यापूर्वी कंगनाने धाकड चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 'धाकड'पूर्वी कंगनाचा 'थलायवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाई करणारा ठरला होता. याशिवाय कंगनाच्या हातात पीरियड ड्रामा 'मणिकर्णिका रिटर्न्स द लिजेंड ऑफ दिड्डा' आणि 'तेजस' सारखे चित्रपट आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित 'इमर्जन्सी'मध्ये कंगना दुसऱ्यांदा दिग्दर्शिका म्हणून दिसणार आहे. कंगना लवकरच या चित्रपटांबद्दल नवीन माहिती देणार आहे.
हेही वाचा - प्रियांका चोप्राचा स्विमसूटमध्ये पाण्यात जलवा पाहा फोटो