मुंबई - बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणौतचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धाकड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचे बजेटही पार होऊ शकलेले नाही. आता चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे कलेक्शन सांगत आहे की कंगनाचा 'धाकड' बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. विशेष म्हणजे रिलीजच्या आठव्या दिवशी देशभरात 'धाकड'ची केवळ 20 तिकिटे विकली गेली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी रिलीज झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जेरदार आपटी खाल्ली. आता दुसऱ्या शुक्रवारचे कलेक्शन सांगत आहे की कंगनाचा हा चित्रपट निर्मात्यासाठी संकट ठरला आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी देशभरात चित्रपटाची केवळ 20 तिकिटे विकली गेली आहेत आणि त्यामुळे एकूण 4,420 रुपयांचे कलेक्शन झाले आहे. अशा परिस्थितीत कंगनाच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीमध्ये 'धाकड' वरच्या स्थानावर पोहोचला आहे.
100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ 3 कोटींची कमाई करू शकला आहे. देशभरातील 25 सिनेमागृहांमध्ये 2100 स्क्रीन्सवर हा चित्रपट सुरू आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मुंबईतील कोणत्याही सिनेमागृहात चालू नाही.
त्याचवेळी 'धाकड'सोबत रिलीज झालेला 'भूल-भुलैया' हा चित्रपट कमाईचा विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या चित्रपटाने एका आठवड्यात 92 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून केवळ दोन पावले दूर आहे.
दुसरीकडे, हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजचा 'टॉप गन-मॅव्हरिक' हा चित्रपट 27 मे रोजी देशात प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर कब्जा करत आहे.
हेही वाचा - बोनी कपूरच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर, सायबर फसवणुकीत लागला लाखोंचा चुना