ETV Bharat / entertainment

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महेश कोठारे यांच्या 'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे प्रकाशन!

बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेले महेश कोठारे यांनी खूप लांबचा पल्ला गाठला. सिनेसृष्टीत जवळपास पंचदशकांचा प्रवास करणाऱ्या महेश कोठारे यांनी आपला जीवनप्रवास पुस्तकरूपात सर्वांसमोर आणला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महेश कोठारे यांच्या 'डॅम ईट आणि बरंच काही' (Damn it ani barach kahi) पुस्तकाचे प्रकाशन झाले. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

author img

By

Published : Jan 12, 2023, 1:09 PM IST

majesh kothare book Damn it ani barach kahi
'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे प्रकाशन!

मुंबई : मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या 'डॅम ईट आणि बरंच काही' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महेश कोठारे, मेहता पब्लिकेशनचे अखिल मेहता, बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे, पुस्तकाचे लेखक-पत्रकार-तारांगणचे संपादक मंदार जोशी उपस्थित होते. याखेरीज किरण शांताराम, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव आदी मंडळीही हजर होती. देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून अनोख्या शैलीत 'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे प्रकाशन केले.

फडणविसांच्या हस्ते प्रकाशन : मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा सांगणारे 'डॅम ईट आणि बरंच काही' हे पुस्तक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात गीत-संगीतांच्या सुरावटीवर आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

'डॅम इट'चा जन्म कसा झाला : यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महेश कोठारे यांचा 'धुमधडाका' प्रदर्शित झाला, तेव्हा मी दहावीत शिकत होतो. मी नागपूरचा असल्याने तिकडे सिनेमे थोडे उशीरा पहायला मिळायचे. 'धुमधडाका' या चित्रपटासोबतच कोठारे यांच्या सर्वच चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवली. महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यामुळे मराठी सिनेमाचा गोडवा लागला. मराठी सिनेमाचा कायापालट करून नवी पिढीला जोडण्याचे काम महेश कोठारेंनी केले आहे. मंदार जोशी यांनी त्यांचे सुरेख चरित्र लिहिले आहे. 'डॅम इट'चा जन्म कसा झाला हे देखील या पुस्तकात वाचायला मिळाले.

यशाचे शिखर गाठताना अपयशही पाहिले : पुस्तक हातात घेतल्यावर लगेच त्यातील बराचसा भाग वाचून काढला. उत्सुकता वाढवणारे हे पुस्तक वाचताना खाली ठेवूच नये असे वाटते. या पुस्तकात कोठारेंनी आपल्या वेदनाही मांडल्या आहेत. कोठारेंनी प्रोफेशनलीझमला खुप महत्व दिले. नवीन लोकांसोबत काम करताना जुन्या कलाकारांसोबतचे संबंधही अबाधित राखले. यशाचे शिखर गाठताना अपयशही पाहिले. मराठीला नवनवीन गोष्टी दिल्या. ते मराठीतील वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक आहेत. मालिका विश्वातही त्यांचे कार्य मोलाचे आहे. कोठारे यांचे मनोरंजन विश्वातील योगदान अतुलनीय आहे. कोठारेंनी मराठीत नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आयुष्यातला खूप मोठा दिवस : 'डॅम इट आणि बरंच काही'च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. तुम्ही सर्वांनी इथे येऊन मला आशीर्वाद दिले याचा खूप खूप आनंद आहे. देवेंद्रजींचा ऋणी आहे. या पुस्तकाद्वारे मी माझे संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणले आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आण संघर्ष आहे. माझ्या आयुष्यात एक भयंकर काळ होता. त्या काळातही काही लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तीसुद्धा आज इथे हजर आहेत. किशोर अग्रहाळकर, लंडनमधील साजीद शेख, मच्छिंद्र चाटेसर असे अनेक लोक आहेत, जे त्यावेळी माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून महेश कोठारे आज हे पुस्तक घेऊन तुमच्यासमोर येऊ शकला. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचे असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल असे मला वाटते. त्यासाठीच हे पुस्तक लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

स्टारडममधील माणूस पाहता आले : 'डॅम इट आणि बरंच काही' या पुस्तक निर्मितीच्या माध्यमातून कोठारेंच्याआड दडलेला स्टारडममधील माणूस पाहता आल्याचे अखिल मेहता म्हणाले. कोठारे यांच्याशी जोडण्याचा प्रवास मंदार जोशी यांनी सांगितला. महेश कोठरेंनी आपल्या यशस्वी प्रवासासोबत चुकांची कबुलीही या पुस्तकात दिली आहे. चार महिने मारलेल्या गप्पामधून उलगडलेले कोठारे यात आहेत. 'धुमधडाका' सिनेमावर ४० पाने आहेत. महेश आणि सचिन पिळगावकर यांच्या आठवणी या निमित्ताने जागवण्यात आल्या.

पडद्यामागे खूप चांगले मित्र राहिलो : सचिन पिळगावकर, महेश कोठारे, निवेदिता सराफ आणि आदिनाथ कोठारे यांचा गप्पांचा फडही या सोहळ्यात रंगला. निवेदिता यांनी कोठारेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाच, पण त्यासोबतच पुस्तकातील काही किस्सेही वाचून दाखवले. सचिन पिळगावकर म्हणाले की, समोर स्पर्धा करणारी व्यक्ती नसेल तर स्पर्धा होऊ शकत नाही. स्वतःची वेगळी शैली असलेल्या प्रतिस्पर्ध्याबद्दलही मनात आपुलकी असते. ती नेहमीच महेशबाबत वाटली. आम्ही कायम पडद्यामागे खूप चांगले मित्र राहिलो आहोत. लोकांना आम्ही प्रतिस्पर्धी असल्याचा आनंद मिळायचा पण आम्ही मात्र आपापल्या चित्रपटांच्या सिल्व्हर-गोल्डन ज्युबिली होण्याचा आनंद साजरा करायचो. माझ्या यशात महेश सामील व्हायचा आणि त्याच्या आनंदात मी नेहमी सहभागी व्हायचो.

कोठारेंची गाजलेली गाणी सादर करण्यात आली : गजमुखा करतो जयजयकार... या गाण्याने पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी..., चिकी चिकी बुबुम बुम..., ही दोस्ती तुटायची नाय... ही कोठारेंची गाजलेली गाणी सादर करण्यात आली. कुबड्या खविस, टकलू हैवान, तात्या विंचू, कवठ्या महांकाळ हे कोठारेंच्या सिनेमातील खलनायकही अवतरले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन आदीनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि रोहित हळदीकर यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.