ETV Bharat / entertainment

Satish Kaushik Death : सतिश कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला? दिल्ली पोलिसांनी स्पष्टच सांगितले...

author img

By

Published : Mar 12, 2023, 8:47 AM IST

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत दिल्ली पोलिसांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी काय केले याची संपूर्ण घटना पोलिसांनी सांगितली आहे. पोलीस सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून पोलिसांनी त्यांच्यावरही संशय व्यक्त केलेला नाही.

Satish Kaushik Death
सतीश कौशिक

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसंदर्भात दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी तपासाचा संपूर्ण तपशील जाहीर केला आहे. अतिरिक्त डीसीपी राजीव कुमार यांनी सांगितले की, सतीश कौशिक होळीच्या दिवशी सकाळी 10 वाजता व्यवस्थापक संतोष रॉय यांच्यासोबत दिल्लीत आले होते. यानंतर ते कापशेरामधील बिजवासन येथील त्यांचा मित्र विकास मालू याच्या पुष्पांजली फार्म हाऊसवर गेले होते. तेथे त्यांनी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होळीचा सण साजरा केला.

श्वास घेण्यास अडथळा : होळीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. दुपारी होळी साजरी केल्यानंतर विश्रांतीसाठी ते गेले. त्यानंतर संध्याकाळी आणि रात्री कोणत्याही पार्टीत ते सहभागी झाले नाही. रात्री ९ वाजता त्यांनी जेवण केले आणि नंतर फेरफटा मारला. झोपण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या आयपॅडवर चित्रपट पाहिला, मग ते झोपले. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. ते त्यांनी संतोष रॉयला सांगितले. यावर त्यांना तात्काळ फोर्टीज रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

संशयास्पद काहीही आढळून आले नाही : तपासादरम्यान, फार्म हाऊसवर विशेष गुन्हे पथकाने आवश्यक पुरावे गोळा केले आणि फोटो काढले. मात्र, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही. ज्या ठिकाणी ते थांबला होते. ज्या खोलीत ते विश्रांती घेत होते. तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचीही चौकशी करण्यात आली. एवढेच नाही तर तेथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले असता त्यातही काहीही आढळून आले नाही. 9 मार्च रोजी डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले गेले. तसेच त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलीस सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून पोलिसांनी त्यांच्यावरही संशय व्यक्त केलेला नाही.

हेही वाचा :Satish Kaushik Death : सतीश कौशिकच्या मृत्यूला नवा ट्विस्ट, फार्म हाऊसमध्ये सापडली संशयास्पद औषधे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.