मुंबई - बॉलिवूड सेलेब्रिटींबद्दल सामान्य माणसांच्या मनात मोठे कुतुहल असते. हे लोक राहतात कसे, जगतात कसे यापासून ते त्यांच्या आवडी निवडीपर्यंत लोक जाणून घ्यायला उत्सुक असतात. अलिकडे भारतात विमानाचा प्रवास पहिल्या तुलनेत स्वस्त झालाय. त्यामुळे लांबच्या शहरात जायचे असेल तर लोक विमान प्रवासाची निवड करतात, यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते. अशावेळी विमानतळावर कोणी क्रिकेटर, गायक, राजकीय नेता किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलेब्रिटीची झलक दिसण्याची शक्यता असते. पण जर तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानातच सेलेब्रिटी असेल तर तुमची उत्सुकता शिगेला पोहोचू शकते. असाच काहीसा अनुभव इंडिगो विमानाच्या प्रवाशांना आला.
हा व्हिडिओ व्हायरल विमानातील प्रवाशी रिलॅक्स असतानाच केशरी रंगाचा ट्रॅकसूट, टोपी आणि सनग्लासेस घातलेली दीपिका पदुकोण चालत आली आणि थेट वॉशरुमच्या दिशेने गेली. तिच्यासोबत सुरक्षा रक्षक असल्यामुळे ती सेलेब्रिटी आहे याची जाणीव प्रवाशांना झाली, पण ती दीपिका पदुकोण असेल यावर क्षणभर लोकांचा विश्वास बसत नव्हता. उपस्थित प्रवाशापैकी कोणीतरी हा व्हिडिओ बनवला, आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिक्स सिग्मा फिल्म्सने शेअर केलेल्या या व्हिडिओत दीपिका वॉशरुमकडे जात असताना एक महिला तिला हाय करताना दिसते.
उपहासात्मक आणि बोचऱ्या कमेंट्स खरंतर सेलेब्रिटी विमानात भेटला की फार मोठे काही तरी घडले असे नाही,' असे म्हणत असंख्य प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. एकाने म्हटलंय की, 'इंडिगोच्या या विमानात इकॉनॉमी क्लासच असतो.' तर एकाने म्हटलंय,कोणत्या क्लासमधून प्रवास करायचा हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. एकदा याच विमानातून चेन्नई ते मुंबई प्रवास करत असताना माझ्या मागच्या सीटवर रणवीर सिंग बसला होता.' एकाने म्हटलंय की, 'यात मोठी गोष्ट काय आहे. का आपण अशा लोकांना महत्त्व देतो. असेल ती सेलेब्रिटी म्हणून एवढी त्यावर चर्चा करायची गरज काय.' तर अनेकांनी लिहिलंय की डोमेस्टीक फ्लाईटमध्ये बिझनेस क्लासच असत नाही. यात काही तिरकस, उपहासात्मक आणि बोचऱ्या कमेंट्सही पाहायला मिळाल्या. एकाने लिहिलं की, 'हिला पठाणचे मानधन मिळाले की नाही. की त्यांनी फक्त हिला बर्याणीवरच भागवले.' तर काहींनी सेलेब्रटींना प्रायव्हसी जपू द्यायला पाहिजे, अशी मत मांडली आहेत. एकंदरीत दीपिका पदुकोणच्या या विमान प्रवासाची चर्चा गंमतीचा विषय बनला आहे.