लॉस एंजेलिस : 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 सोहळ्याने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. 'RRR' या तेलुगू चित्रपटातील नाटू नाटू या सुपरहिट गाण्याने ऑस्कर जिंकून जगभरात भारताचे नाव अभिमानाने उंचावले आहे. संपूर्ण देश नाटू नाटूच्या ऑस्कर जिंकण्यासाठी प्रार्थना करत होता. नाटू नाटूच्या विजयाची घोषणा होताच संपूर्ण चित्रपटाच्या टीमसह देशभरात आनंदाच्या लाटा उसळल्या.
दीपिका झाली भावूक : पुरस्कार मिळाल्यानंतर गाण्याचे लेखक चंद्रबोस आणि संगीतकार एमएम किरवाणी यांनी ऑस्करच्या मंचावर भाषण केले. ज्येष्ठ संगीतकार किरवानी यांनी ऑस्कर पुरस्कार हा भारताचा विजय असल्याचे म्हटले असून त्यांनी हा पुरस्कार प्रत्येक देशवासीयांच्या नावावर केला आहे. यावेळी ऑस्कर सोहळ्यात पाहुण्यांमध्ये बसलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण किरवानी यांच्या या वक्तव्याने भावूक झालेली दिसली. दीपिका पदुकोण 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रस्तुतकर्ता म्हणून सामील झाली आहे.
अवॉर्ड्समध्ये दीपिका सादरकर्त्यांपैकी एक : नाटू नाटू गाण्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्यानंतर काही वेळानंतर या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी निवडण्यात आले. स्टेजवर पुरस्कार स्वीकारल्यानंतर या गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी जेव्हा या गाण्याबद्दलच्या आपल्या भावना प्रेक्षकांसोबत शेअर करत होते, तेव्हा दीपिका पदुकोण भावूक होताना दिसली. हे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण 95 व्या ऑस्कर अकादमी अवॉर्ड्समध्ये सादरकर्त्यांपैकी एक आहे. तिने या प्रतिष्ठित अवॉर्ड शोमध्ये प्रभावी हजेरी लावली आहे. ऑस्कर पुरस्काराच्या वेळी शॅम्पेन रंगाच्या कार्पेटवर ती सुंदर असा काळ्या रंगाचा गाऊन घालून दिसली. सोहळ्यात दीपिकाने मंचावरून RRR च्या नाटू नाटू या गाण्याचे नामांकन जाहीर केले होते.
दीपिकाचा खास विंटेज लुक : ऑस्कर 2023 मध्ये दीपिकाने निकोलस गेस्क्वेअरने डिझाईन केलेला लुई व्हिटॉन गाऊन परिधान केला आहे. ऑस्करसाठी दीपिकाचा हा लूक तिची दीर्घकाळची सहकारी आणि स्टायलिस्ट शालीना नाथानी यांनी डिझाईन केला आहे. ऑस्कर साठी तिने खास हा कमीतकमी ग्लॅमरस आणि विंटेज लुक निवडला आहे. दीपिकाने तिचे केस बनमध्ये बांधलेले होते. पुरस्कार सोहळ्यात तिचा लूक आणखी आकर्षक दिसण्यासाठी तिने कार्टियर नेकलेस आणि चमकदार ब्रेसलेट देखील घातले होते.
हेही वाचा : Naatu Naatu Oscars 2023 : आरआरआरमधील नाटू नाटूला ऑस्कर पुरस्कार, देशभर जल्लोष