ETV Bharat / entertainment

DDLJ ची २७ वर्षे पूर्ण, शाहरुख - काजोलच्या ब्लॉकबस्टरची काही खास वैशिष्ट्ये - डीडीएलजे काही खास वैशिष्ट्ये

शाहरुख खान आणि काजोल स्टारर ब्लॉकबस्टर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 20 ऑक्टोबर रोजी 27 वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला होता.

शाहरुख खान आणि काजोल
शाहरुख खान आणि काजोल
author img

By

Published : Oct 20, 2022, 1:50 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक रोमँटिक 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 20 ऑक्टोबर रोजी 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडचा 'बादशाह' आणि 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खानने या चित्रपटातून आपली रोमँटिक इमेज तयार केली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसली आणि ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक रोमँटिक जोडी बनली. या जोडीला त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून खूप चाहते मिळाले, जे आजही त्यांच्या जोडीचे वेड आहेत.

4 कोटींमध्ये बनला होता DDLJ - 1995 साली 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'DDLJ' सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 89 कोटींचा व्यवसाय केला होता. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 89 कोटी आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर 13.50 कोटी. त्यावेळी चित्रपटाची एकूण कमाई 102 कोटी रुपये होती.

राज-सिमरनची जोडी गाजली - या चित्रपटातील शाहरुख खान आणि काजोल यांच्यातील रोमान्स या जोडप्याच्या चाहत्यांना अजूनही आवडतो. आजही शाहरुख-काजोलची राज-सिमरमन जोडी चाहत्यांच्या हृदयात कायम आहे.

आदित्य चोप्राने या चित्रपटाद्वारे केले पदार्पण - दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मोठा मुलगा आदित्य चोप्रा याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्राने दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट एवढा हिट ठरेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

चित्रपटातील गाण्यांनी मोडले रेकॉर्ड - 'मेहंदी लगा के रखना' या गाण्याशिवाय भारतीय लग्न पूर्ण होत नाही. या गाण्याची क्रेझ तेव्हाही तेवढीच आहे. याशिवाय 'तुझे देखा तो', 'ना जाने मेरे दिल को क्या हो गया', 'जरा सा झूमलूँ मै', 'मारे ख्वाबों में जो आये' आणि 'रुकजा ओ दिल दिवाने' या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली आहेत.

एवढेच नाही तर या सर्व गाण्यांमध्ये आजही सारखाच रस आहे आणि त्यामुळे क्षणभरही कंटाळा येत नाही. चित्रपटातील एकेक गाणे आजही लोकांच्या ओठावर कोरले गेले आहे. चित्रपटातील जतिन-ललित यांच्या संगीताने चित्रपटातील प्रत्येक गाण्यात प्राण फुंकले आहेत.

चित्रपटाची स्टारकास्ट - चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान आणि काजोल व्यतिरिक्त चित्रपट निर्माते करण जोहर, अनुपम खेर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, मंदिरा बेदी आणि परमीत सेठी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. या सर्व पात्रांनी प्रेक्षकांना स्वतःकडे आकर्षित केले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील असा पहिला चित्रपट - DDLJ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव चित्रपट आहे जो सर्वात जास्त काळ चित्रपटगृहात चालला आहे. 'DDLE' हा चित्रपट सलग 20 वर्षे मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये चालला, जो हिंदी चित्रपटसृष्टीतील इतिहास आहे.

शाहरुख खानला नव्हता पहिली पसंती - याआधी या चित्रपटासाठी हॉलिवूड स्टार टॉम क्रूजला घेण्याची चर्चा होती, पण ते शक्य झाले नाही. यानंतर या चित्रपटासाठी शाहरुख खानच्या आधी सैफ अली खानची निवड केली जाणार होती, मात्र तारखेच्या शेड्यूलमुळे हा चित्रपट सैफच्या हातातून निसटला. शेवटी हा चित्रपट शाहरुख खानच्या झोळीत पडला आणि तो 'लंबी रेस का घोडा' आहे हे त्याने दाखवून दिले.

फिल्म अवॉर्ड्स - 1995 मध्ये 'DDLJ' चित्रपटाने 10 फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. या चित्रपटानंतर शाहरुख खानने कधीच मागे वळून पाहिले नाही.

हेही वाचा - दर दिवाळीपूर्वी मनीष पॉल घेतो अमिताभची भेट, पण का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.