ETV Bharat / entertainment

DARA SINGH SON VINDU DARA SINGH : आदिपुरुषमधील हनुमानजींच्या पात्रावर दारा सिंहचा मुलगा संतापला - देवदत्त नागे

वर्षातील सर्वात वादग्रस्त चित्रपट 'आदिपुरुष'वर टीका थांबण्याचे नाव घेत नाहीये. रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये मुख्य भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर आता हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

VINDU DARA SINGH
विंदू दारा सिंग
author img

By

Published : Jul 4, 2023, 5:17 PM IST

मुंबई: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज होताच त्याच्या टोपोरी डायलॉग्स आणि खराब व्हीएफएक्समुळे मोठा वादात सापडला होता. यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही यावर आपले मत व्यक्त केले, विशेषत: रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया यांनी आदिपुरुषवर दिलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता नुकतेच रामायणात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंग यानेही यावर भाष्य केले आहे.

'आदिपुरुष' वादग्रस्त चित्रपट : रामानंद सागर यांच्या लोकप्रिय शो 'रामायण'मध्ये विंदूचे वडील दिवंगत दारा सिंह यांनी हनुमानजींची भूमिका साकारली होती. तसेच आता 'आदिपुरुष' वादाच्या पार्श्‍वभूमीवर, विंदू दारा सिंग म्हटले की, 'हा चित्रपट रामायणात काम करणाऱ्या पात्रांचा वारसा बदलण्याचा प्रयत्न करतो'.'हनुमानजी हे सामर्थ्यवान होते आणि ते नेहमी हसत असत. पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याला (देवदत्त नागे)ला हिंदीत नीट बोलताही येत नाही, त्याला दिलेल्या संवादांला त्याने काहीतरी वेगळेच केले आहे. कदाचित त्यांनी मार्वल चित्रपट पाहणाऱ्या तरुण पिढीला लक्षीत केले असावे. पुढे त्याने म्हटले, 'भविष्यात रामायण कोण स्वीकारेल याची त्याला पर्वा नाही, माझा विश्वास आहे की कोणीही माझ्या वडिलांच्या वारशात अडथळा आणू शकत नाही किंवा त्यांनी पडद्यावर जे काही केले आहे त्याच्या जवळही कोणी येऊ शकत नाही. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखेने इतिहास रचला आहे आणि हे आदिपुरुषाचे पात्र त्यांच्या आसपासही नाही.

'आदिपुरुष' चित्रपटामुळे दुखावला विंदू दारा सिंग : विंदूने सांगितले की 'आदिपुरुष' मुळे तो खूप दुखावला गेला होता आणि निर्मात्यांनी ज्या प्रकारे चित्रपट बनवला ते पाहून त्याला लाज वाटली. त्यांनी याला वेगळे नाव द्यायला हवे होते, जर ते रामायण बनवायचे ठरवत असतील तर त्यांनी कथेत फेरफार करायला नको होता. एवढ्या मोठ्या बजेटचा एक उत्तम चित्रपट बनवण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी वाया घालवली. रावणाची लंका सोन्याची होती, काळ्या दगडाची नव्हती हे जगाला माहीत आहे. ते फक्त मजेदार बोलून कथेशी खेळले आहे जे खूपच निराशाजनक आहे. या चित्रपटात प्रभासने राघवची भूमिका साकारली आहे, क्रितीने जानकीची, सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. यासोबतच देवदत्त नागेने हनुमानाची तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :

  1. Rocky Aur Rani Kii Prem Kahani trailer: करण जोहरच्या रोमँटिक ड्रामामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा पॉवर हाऊस परफॉर्मन्स
  2. Sitaras Times Square debut : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकली सितारा, आई वडिलांचा आनंद भिडला गगनाला
  3. Tarantino on Kill Bill 3 : माया हॉकसह किल बील ३ बनण्याची शक्यता क्वेंटिन टॅरँटिनोने फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.