मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ( Uddhav Thackeray Resigns ) राजीनाम्यानंतर गडगडले. त्यानंतर या सरकारला विरोध करणाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सरकार विरोधात केवळ विरोधी पक्षच नव्हता तर विरोधी पक्षाची बाजू नेहमी घेणारी बॉलिवूड क्विन कंगना रणौतही ( Kangana Ranaut ) होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात सतत आवाज उठवणाऱ्या कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अवैध बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला होता. तेव्हा तिने या सरकारची घमेंड उतरेल अशी टीका केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने एक व्हिडिओ पोस्ट करुन अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे व शिवसेनेवर ( Shivsena ) टीकेचा निशाणा साधला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
''१९७५ नंतर भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाची वेळ आहे. १९७५ ला लोकनेता जेपी नायारण यांच्या सिंहासन सोडा या गर्जनेने सिंहासन सोडावे लागले होते. २०२० मध्ये मी म्हटले होते, लोकतंत्र एक विश्वास आहे. जे सत्तेच्या घमेंडीत हा विश्वास तोडतात त्याची घमेंड तुटणार हे निश्चित आहे. ही कोणत्या व्यक्ती विशेषची शक्ती नाही, ही शक्ती आहे एका प्रमाणिक चारित्र्याची. आणि दुसरी गोष्ट हनुमानजींना शिवाचा १२ वा अवतार मानले जाते आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चालीसावर बंदी आणते तेव्हा स्वतः शिवही वाचवू शकत नाहीत. हर हर महादेव, जय हिंद, जय महाराष्ट्र.'' असे कंगनाने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने हिंदीत लिहिलंय, ''जब पाप बढ़ जाता है, तो सर्वनाश होता है और उस के बाद सृजन होता है…''
कंगनाच्या या व्हिडिओनंतर तिच्या समर्थकांनी दिला भरपूर प्रतिक्रिया देऊन तिच्या म्हणण्याला संमती दर्शवली आहे. कंगनाला काही महिन्यापासून केंद्र सरकारची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना नेहमी वादात आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिच्या या व्हिडिओनंतर शिवसेना आणि इतरांकडून कशी राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावे लागेल.
कंगना रणौत आणि वाद - कंगनाच्या ट्विटवरुन तयार झालेल्या वादाची यादी करायचे ठरवले तर हा लेख त्यावरच लिहावा लागेल. परंतु कंगनाच्या नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन बराच वाद झाला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर कंगनाचे ट्विटर पेज नियमित निशाणा साधत राहिले. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी यावर तिने सतत टीका केली. करण जोहर आणि भट्ट कँपवर ती सतत बरसत राहिली. त्यानंतर तिने महाराष्ट्र सरकारशीही पंगा घेतला. मुंबई पोलिसांवरही टीका करायला ती कमी पडली नाही. मुंबईची तुलना पीओकेशी करुन तिने नवा वाद ओढवून घेतला. तिच्या मुंबईच्या ऑफिसवर बीएमसीने हातोडा चालवल्यावर ती आणखीनच आक्रमक झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरीवर करण्यापर्यंत तिची मजल गेली. वर्ष अखेरीस तिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही काही वादग्रस्त ट्विट केले. त्यानंतर कंगना विरुध्द दिलजीत दोसांझ यांचे ट्विटर युध्द पाहायला मिळाले.
हेही वाचा - स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल