ETV Bharat / entertainment

Cricket World Cup 2023: सचिन तेंडुलकरबरोबर अनुष्का शर्माचा फोटो व्हायरल; विराटसाठी बनणार चीअरगर्ल... - म्युझिकल ओडिसी कार्यक्रम

Cricket World Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक क्रिकेट 2023 सामन्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मासह सचिन तेंडुलकर, दिनेश कार्तिक अहमदाबादला पोहोचले आहेत. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय सामान्यापूर्वी 'म्युझिकल ओडिसी' नावाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये गायक अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन हे कलाकार परफॉर्म करणार आहेत.

Cricket World Cup 2023
क्रिकेट विश्वचषक २०२३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 12:48 PM IST

Updated : Oct 14, 2023, 2:44 PM IST

मुंबई - Cricket World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ शनिवारी १४ ऑक्टोबरला विश्वचषकात आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. आतापर्यतच्या विश्वचषकांमध्ये सात सामने टीम इंडियानं सर्व सामने जिंकले आहेत. दरम्यान आता दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला पोहोचत आहेत. भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांच्या वेळी विराट कोहलीची पत्नी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित असते. दरम्यान, आता अनुष्का शर्मा सकाळीच अहमदाबादला पोहोचली आहे. अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ती सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकबरोबर होती. दिनेश कार्तिकनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का ही कार्तिक आणि सचिन तेंडुलकरसह दिसत आहे.

'हे' गायक आपल्या आवाजाची पसरवणार जादू : प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो परफॉर्म करणार आहे. बीसीसीआयनं 'म्युझिकल ओडिसी' नावाच्या संगीत कार्यक्रमादरम्यान कलाकारांची स्टार-स्टडेड यादी देखील उघड केली. यामध्ये अरिजित हा दुसऱ्यांदा या स्टेडियमवर परफॉर्म करणार आहे. याआधी त्यानं आयपीएल २०२३च्या ओपनिंग मॅचपूर्वी परफॉर्म केलं होतं. याशिवाय सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन हे देखील गायक यावेळी परफॉर्म करणार आहेत. गायकांव्यतिरिक्त, दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचतील. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि अभिनेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री, बीसीसीआयने ट्विट केले की या कार्यक्रमात दिग्गज गायक अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन परफॉर्म करताना दिसेल. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये हे तीन गायक आपल्या आवाजाची जादू पसरवणार आहेत.

भारत - पाकिस्तान सामना : मिळालेल्या माहितीनुसार, हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये सुमारे 1,30,000 प्रेक्षक उपस्थित असतील. हा सामना भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या दोन्ही संघामध्ये जेव्हाही टक्कर होते, तेव्हा या सामन्यात प्रत्येक देशवासी सहभागी होतात. या सामन्यासाठी दोन्ही देशासह जगभरातील प्रेक्षक खूप आतुर आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर कायम वर्चस्व गाजवलं आहे आणि आतापर्यंत सर्व म्हणजे सातही सामने जिंकले असले, तरी अलीकडच्या वर्षांत पाकिस्ताननं जबरदस्त कामगिरी केली आहे. आता या सामन्यात कोण विजयी होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा :

  1. Vrushabha Shoot : शनाया कपूरनं शेअर केला मोहनलाल आणि 'वृषभ' चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत फोटो
  2. Alia Bhatt recalls Sam Bahadur story: 'सॅम बहादूर'ची कथा ऐकल्यावर चमकला होता विकी कौशल, आलिया भट्टनं सांगितली आठवण
  3. Rajkummar Rao And Patralekha : राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाचा रोमँटिक व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ...

Last Updated : Oct 14, 2023, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.