ETV Bharat / entertainment

राजू श्रीवास्तवनंतर कॉमेडियन पराग कंसाराचे निधन

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कॉमेडियन पराग कंसारा यांचे निधन झाले आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पराग कंसाराचे निधन
पराग कंसाराचे निधन
author img

By

Published : Oct 6, 2022, 4:42 PM IST

मुंबई - प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचे दु:ख अजून संपले नव्हते तोच मनोरंजन जगतातून आणखी एक धक्कादायक वाईट बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमध्ये कॉमेडी करणारे कॉमेडीयन पराग कंसारा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

कॉमेडियन सुनील पाल यांनी दिली दु:खद बातमी - सुनील पाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, कॉमेडी जगतातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमचे सहकारी पराग कंसारा राहिले नाहीत. नुकतेच राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर आता परागबाबत ही दुःखद बातमी समोर आली आहे.

पराग कंसारा यांचा प्रवास - कॉमेडियन पराग कंसारा गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी होता. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या लोकप्रिय कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसला होता. परागची विनोदी शैली खूप आवडली. कॉमेडी शोमध्ये तो कधीही विजेता ठरला नसला तरी त्याने आपल्या कॉमेडीने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. पराग कंसाराही अनेक कॉमेडी शोमध्ये कॉमेडी करताना दिसला आहे.

'गजोधर भैय्या' यांचे 15 दिवसांपूर्वी निधन झाले होते - एका महिन्यात कॉमिक जगतातील हा दुसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध कॉमेडियन आणि राजकारणी राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला होता.

42 दिवसांपासून राजू श्रीवास्तव होता रुग्णालयात भरती - राजू श्रीवास्तव 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि ट्रेडमिलवर धावत असताना अचानक तो पडला. राजूला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर सतत 42 दिवस आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. 22 सप्टेंबर रोजी बातमी आली की राजू श्रीवास्तव या जगात राहिले नाहीत. राजूच्या मृत्यूचा धक्का अजून ओसरला नव्हता की आता पराग कंसारा यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आणि विनोदवीरांना धक्का बसला आहे.

हेही वाचा - साजिद खान बिग बॉसमध्ये सामील झाल्यामुळे भडकली उर्फी जावेद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.