ETV Bharat / entertainment

Cobra Trailer Release विक्रमचे अनेक अवतार पाहताना प्रेक्षक थक्क - इरफान पठाण चित्रपट पदार्पण

साऊथचा सुपरस्टार विक्रमचा बहुप्रतिक्षित चित्रपट कोब्राचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात क्रिकेटर इरफान पठाणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Etv Bharat
विक्रमचे अनेक अवतार पाहताना प्रेक्षक थक्क
author img

By

Published : Aug 26, 2022, 3:17 PM IST

हैदराबाद तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या विक्रमच्या बहुप्रतिक्षित 'कोब्रा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच चांगला आहे आणि त्यात अभिनेत्याचा दमदार अवतार पाहायला मिळत आहेत. 'कोब्रा' हा अॅक्शनने भरलेला थ्रिलर चित्रपट आहे. ट्रेलर पाहताना प्रेक्षकांचा थरकाप उडत आहे. या चित्रपटात विक्रम २५ वेगवेगळ्या अवतारात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजय आर ज्ञानमुथू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर इतका सुंदर आहे की विक्रमचे बदलणारे अवतार डोळ्यांचे पारणे फेडतात. याआधी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता या चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्रेलरमध्ये विक्रमचे 25 वेगवेगळे अवतार पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात विक्रम एका महान गणितज्ञाच्या भूमिकेत आहे, ज्याला गणिताचा गुरू मानला जातो.

चित्रपटाची स्टारकास्ट - चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाणही चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटात तो पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF' फेम अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी यात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 31 ऑगस्टला तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.

विक्रमचा मागील चित्रपट - साऊथचा अभिनेता विक्रम शेवटचा 'महान' चित्रपटात दिसला होता. 'महान' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज यांनी केले होते. दक्षिणेतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला 'पोन्नियिन सेल्वन 1' हा विक्रमचा पुढील चित्रपट आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी, त्रिशा, प्रकाश राज आणि शोभिता धुलिपाला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा - Sonali Phogat Case अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे सोनाली फोगाटचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.