ETV Bharat / entertainment

Chowk release postponed : चौकच्या निर्मात्याने दाखवला मनाचा मोठेपणा, बॉक्स ऑफिसवरील टळली स्पर्धा

बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर टाळण्यात चौक या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुढाकार घेतला आहे. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात बलोच आणि रावरंभा हे दोन चित्रपट रिलीज होणार होते. याच दरम्यान रिलीज होणाऱ्या चौक या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपसातील स्पर्धा टाळण्यासाठी चित्रपट रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Etv Bharat
चौकचे रिलीज पुढे ढकलले
author img

By

Published : Apr 26, 2023, 10:04 AM IST

मुंबई - चित्रपट निर्मितीची संख्या बरीच वाढलेली आहे. परंतु ते प्रदर्शित करण्यासाठी वर्षात फक्त ५२ आठवडे असतात. दर शुक्रवारी अनेक भाषांमधील १५ ते २० चित्रपट प्रदर्शित होत असतात. मराठी चित्रपटांच्या बाबतीतही चित्रपट प्रदर्शनासाठी स्पर्धा दिसून येते. निर्मात्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. कारण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात सर्वांचेच नुकसान होत असते. मराठी चित्रपट निर्मात्यांनी हे मनावर घेतले तर अनावश्यक स्पर्धा टळेल आणि आर्थिक गणितही बिघडणार नाही. परंतु एका निर्मात्याने समजुतदारपणा दाखवत आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. हा चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श बनू शकतो.

चौकचे रिलीज पुढे ढकलले
चौकचे रिलीज पुढे ढकलले

चौकचे रिलीज पुढे ढकलले - सध्या शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेच चित्रपट प्रदर्शित होत असतात. येत्या ५ मे ला 'बलोच' प्रदर्शित होणार आहे तसेच १२ मे ला 'रावरंभा' रिलीज होत आहे. हे दोन्ही ऐतिहासिक कथानकांवर आधारित चित्रपट असून ते बघायला बच्चेकंपनी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. याच दरम्यान १२ मे ला चौक हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु चौकच्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक आठवडा पुढे ढकलली आहे. तो चित्रपट आता १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हे एक कौतुकास्पद पाऊल असून निर्मात्यांनी सल्लामसलत करून चित्रपट प्रदर्शित केले तर मराठी चित्रपटसृष्टीला त्याचा फायदाच होईल. आपसातील स्पर्धा टाळत चित्रपटांच्या रिलीज डेटस् सांभाळल्या तर प्रत्येक मराठी चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग मिळू शकेल. दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील यांनी 'चौक' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेतल्याचे सर्वांना कळविले.

स्पर्धा टाळण्यात निर्मात्यांना यश - 'चौक' चे दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की, 'मराठी चित्रपटसृष्टीत सर्व मित्रच आहेत. एकमेका सहाय्य करू हे ब्रीद जवळपास सर्वच जण पाळतात. बलोच आणि रावरंभा हे चित्रपट आमच्या मित्रांनीच बनविले आहेत जे मे महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. कुठल्याही चित्रपटाच्या आड आपला सिनेमा येऊ नये म्हणून आम्ही आमचा चित्रपट चौक याचे प्रदर्शन एक आठवड्याने पुढे नेले आहे.' प्रविण तरडे म्हणाले की, 'आपल्या दिग्दर्शन पदार्पणीय चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलून आमचा मित्र दयाने मनाचा मोठेपणा दाखविला आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. त्याचे आणि संपूर्ण चौक च्या टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा. 'चौक' आता येत्या १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - Sushmita Sen Aarya 3 : सुष्मिता सेन 'आर्या 3'च्या सेटवर परतली, हृदयविकाराच्या झटक्यानंतर थांबले होते शुटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.