ETV Bharat / entertainment

Chandramukhi 2 Release Date : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार 'चंद्रमुखी 2'

चंद्रमुखीचा सीक्वेल चंद्रमुखी 2 हा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

चंद्रमुखी 2
Chandramukhi 2
author img

By

Published : Jun 30, 2023, 10:44 AM IST

मुंबई : 'चंद्रमुखी' हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका होती. ' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत आहे. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, चंद्रमुखीची रिलीज डेट जाहीर झाली आहे. चंद्रमुखीचा सीक्वेल चंद्रमुखी 2 या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून अंतिम पोस्ट प्रॉडक्शनचे काम वेगाने सुरू आहे. दिग्दर्शक पी वासू यांचा 'चंद्रमुखी 2' हा रजनीकांतच्या 2005 चा हिट चित्रपट चंद्रमुखीचा सीक्वेल आहे.

चंद्रमुखी 2 : हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान राघव लॉरेन्स, वडिवेलू आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 19 सप्टेंबर 2023 जाहीर केली आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. राघव लॉरेन्सने पोस्ट शेअर करत लिहले, 'आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की, बहुप्रतिक्षित चित्रपटाचा सीक्वल 'चंद्रमुखी 2' चे दरवाजे गणेश चतुर्थीपासून उघडतील. या चित्रपटात कंगना रनौत, राधिका सरथकुमार, राघव लॉरेंस, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, मुरुगेसन हे कलाकर दिसणार आहे. 'चंद्रमुखी 2' या चित्रपटाचे पोस्टर खूपच आशादायक दिसत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांचा प्रतिसाद देखील सकारात्मक दिसत आहे आणि प्रत्येकजण ते थिएटरमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.

चंद्रमुखी चित्रपटाची कहाणी : चंद्रमुखी चित्रपटाची कहाणी, विकाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेभोवती फिरणारी आहे. या महिलेच्या विकाराने कुटुंबावर परिणाम होत असतो. त्यानंतर या महिलेचा विकार दुर करण्यासाठी एक मानसोपचार तज्ज्ञ बोलावल्या जातो . हा मानसोपचार तज्ज्ञ आपला जीव धोक्यात घालून तिला वाचवितो. हा चित्रपट १९० दशलक्षच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाची शूटिंग 24 ऑक्टोबर 2004 रोजी सुरू झाले आणि हा चित्रपट 2005 मध्ये रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.