ETV Bharat / entertainment

third week of Butterfly: तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात बटरफ्लाय यशस्वी - मराठी चित्रपट बटरफ्लाय

मराठी चित्रपट निर्मात्यांची अनेक तक्रारी असतात. थिएटर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र थिएटर मिळाल्यानंतर तिथे मराठी सिनेमा प्रेक्षकांना खेचू शकतो हे अलिकडेच रिलीज झालेल्या बटरफ्लायने दाखवून दिलंय.

third week of Butterfly
बटरफ्लाय तिसरा आठवडा
author img

By

Published : Jun 17, 2023, 5:53 PM IST

मुंबई - मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघण्यास मोठ्या संख्येने जात नाहीत. मराठी चित्रपटांना थिएटर मालक सापत्न वागणूक देतात. हिंदी चित्रपट निर्मात्यांकडून मराठी चित्रपट निर्मात्यांना दुय्यम वागणूक मिळते. ही सर्व स्टेटमेंटस् नेहमी कानावर येत असतात, कारण मराठी चित्रपट फारसे चालत नाहीत. परंतु नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट बटरफ्लायने मात्र या सर्वांवर मात करीत चांगला धंदा केलाय. नुकताच या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात मुसंडी मारली असून पुढेही तो चांगला चालेल अशी अपेक्षा निर्माते बाळगून आहेत.

हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांच्या गर्दीत हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यांच्या स्पर्धेला तोडीस तोड टक्कर देत उभा राहिला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे बटरफ्लाय तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करीत आहे. तसेच तो हाऊसफुल गर्दी खेचत आहे. हा प्रेक्षक पसंती मिळविलेला चित्रपट कुठलीही मोठी निर्मिती संस्था अथवा कुठलाही मोठा प्रोड्युसर वा कुठल्याही फिल्म स्टुडिओचा पाठिंबा नसताना चालतोय ही मराठी चित्रपटांसाठी चांगली बाब आहे.

बटरफ्लाय या चित्रपटाने दाखवून दिले की मराठी प्रेक्षकांना कौटुंबिक विषय तरलतेने हाताळलेला चित्रपट हमखास आवडतो. या चित्रपटाचे कथानक साधे, सरळ असून ती कथा मांडली गेली आहे सरळ सोप्या पद्धतीने. पदार्पणीय दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने मराठीचा स्वाद कायम ठेऊन संपूर्ण कुटुंब एकत्र पाहू शकेल असा सिनेमा बनविला असून त्यातील कलाकारांनी, महेश मांजरेकर, मधुरा वेलणकर, अभिजित साटम, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर ई., तन्मयतेने यात काम केले आहे ज्याची सर्व स्तरावरून स्तुती होताना दिसतेय. तिने सिद्ध केले की केवळ भपकेबाज चित्रपट चालत नाहीत तर प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे साधे चित्रपटदेखील चालू शकतात.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील सिनेमाबद्दल खूप काही सांगून जातात. उदा...बऱ्याच काळानंतर असा सिनेमा मराठीत आला.....कुटुंबीयांनी एकत्रितपणे बघावा असा चित्रपट....आवर्जून बघावा असा सिनेमा....प्रत्येक प्रेक्षकांशी रीलेट होणार पिक्चर...इत्यादी चांगलं बनवलं, चांगलं दाखवलं, चांगलं वाढलं तर मराठी प्रेक्षक त्याला पाठिंबा देण्यासाठी कुचराई करीत नाही हे ‘बटरफ्लाय‘ चित्रपटाने अधोरेखित केले आहे.

हेही वाचा -

१. War 2 Movie : वॉर 2मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर बरोबर झळकणार कियारा अडवाणी

२. Sushmita Sen-Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा येणार एकत्र ?

३. Ram Charan Latest News : राम चरण आणि उपासना कोनिडेलाला मिळाली एक खास भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.