ETV Bharat / entertainment

BOX OFFICE COLLECTION DAY 2 : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईचा वेग बॉक्स ऑफिसवर मंदावला - बॉक्स ऑफिस

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा रोमँटिक चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा गुरुवारी ईदच्या सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी रूपेरी पडद्यावर चांगली कमाई केली होती मात्र दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग थोडा मंदावला आहे.

BOX OFFICE COLLECTION DAY 2
बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २
author img

By

Published : Jul 1, 2023, 12:14 PM IST

मुंबई: बॉलिवूड अभिनेत कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा रोमँटिक चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' गुरुवारी ईदच्या सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाला. मात्र आता शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईचा वेग थोडा मंदावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सत्यप्रेम की कथा'ने दुसऱ्या दिवशी सुमारे 7.19 कोटी कमावले आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशी 9.25 कोटींची कमाई झाली होती. दरम्यान, 'सत्यप्रेम की कथा'चे एकूण कलेक्शन आता सुमारे 24.46 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन समीर विद्वांस केले असून 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये सुप्रिया पाठक, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'सत्यप्रेम की कथा' बॉक्स ऑफिस कलेक्शन: शुक्रवारी, कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक नोट लिहिली. ज्यामध्ये तिने चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. कियाराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आज जर माझ्या हृदयाला काहीही भिडले असेल तर तुम्ही लोकांनी चित्रपटाला दिलेले इतके प्रेम आहे. चाहत्यांच्या या प्रेमाने मी खूप भावूक झाले आहे. चित्रपटाचे हे यश आपल्या सर्वांचे आहे, हे खरोखरच जादुई आहे. मी फक्त कृतज्ञ आहे'

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद : बॉक्स ऑफिस व्यतिरिक्त, जर आपण चित्रपटाच्या पुनरावलोकनाबद्दल बोललो तर, 'सत्यप्रेम की कथा'ला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला मनोरंजनाच्या साईडने 4.5 स्टार दिले आहे. या चित्रपटामधील गाणीही लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल चांगले रिव्हयू दिले आहे. याशिवाय चित्रपटाबद्दल काही चाहत्यांनी कियारा आणि कार्तिकची प्रशंसा केली आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर घोषीत करण्यात आले होते. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियावाल आहेत. आधी या चित्रपटाचे नाव 'सत्यनारायण की कथा' असे ठेवण्यात आले होते पण नंतर वादांमुळे या चित्रपटाचे नाव बदलून 'सत्यप्रेम की कथा' असे करण्यात आले. 'भूल भुलैया 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धमाल करत आहे.

हेही वाचा :

  1. Charlie Chopra motion poster : विशाल भारद्वाज दिग्दर्शित मिस्ट्री थ्रिलर 'चार्ली चोप्रा'चे मोशन पोस्टर रिलीज
  2. SUNIL LAHRI : आलिया भट्ट साकारणार सीतेची भूमिका, लक्ष्मण फेम सुनील लाहिरीने दिली लक्षवेधी प्रतिक्रिया
  3. Housefull 5 Release Date OUT : अक्षय कुमारने हाऊसफुल 5 ची केली घोषणा, सांगितली रिलीजची तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.