ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई - सॅम बहादूर

Box Office day 3 movie : अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा करत आहेत. दोन्ही चित्रपटांच्या रिलीजचा आजचा तिसरा दिवस आहे.

Box Office day 3 movie
बॉक्स ऑफिस चित्रपट दिवस 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 1:10 PM IST

मुंबई - Box Office day 3 movie : रणबीर कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतला दमदार अभिनेता आहे. सध्या तो त्याच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळं चर्चेत आहे. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांवर जादू केली आहे. दुसरीकडे, विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटालाही प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' रिलीजच्या तिसऱ्या दिवसात आहेत. हे चित्रपट प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी किती कमाई करेल, हे जाणून घेऊ या.

'अ‍ॅनिमल'ची कमाई : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडतोय. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळालंय. 'अ‍ॅनिमल' मधली काही दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रौढांसाठी असला, तरी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. या चित्रपटानं दोन दिवसांच्या कमाईत 100 कोटींचा टप्पाही पार केला आहे. 'अ‍ॅनिमल'च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं पहिल्या दिवशी 63.8 कोटींची दमदार कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 66 कोटींची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 129.80 कोटी झालं आहे. याशिवाय हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवसअखेर 14.94 कोटींची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 145.33 कोटी होईल.

'सॅम बहादूर'ची कमाई : फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपटही 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाची कहाणी आणि विकीच्या अभिनयाचं समीक्षकांसोबतच अनेक चित्रपटसृष्टीतल्या नामवंतांनीही कौतुक केलंय. या चित्रपटात विकी व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, नीरज काबी आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 6.25 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटानं, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 9 कोटींची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 15.25 कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या दिवअखेर अंदाजे 2.62 कोटी रु. कमाई करू शकतो.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'मधील उत्तम अभिनयाबद्दल ईशा देओलनं भाऊ बॉबी देओलचं केलं कौतुक
  2. 'बिग बॉस 17'मध्ये खानजादीच्या मेंटल हेल्थवर 'जवान' अभिनेत्री रिद्धी डोगरानं केली पोस्ट शेअर
  3. दयाबेन 'तारक मेहतात' परतली, जेटालाल कुटुंबात उत्साहाचं वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.