ETV Bharat / entertainment

Prabhas Birthday : प्रभासच्या हातात धनुष्यबाण; आदिपुरुषचा नवा पोस्टर लाँच - प्रभासचा आगामी चित्रपट

अभिनेता प्रभासच्या वाढदिवशी आदिपुरुषचा पोस्टर लॉंच करण्यात ( prabhas upcoming films ) आला. प्रोजेक्ट केच्या टीमने पोस्टर चाहत्यासोर आणला आहे.

Prabhas
आदिपुरुष
author img

By

Published : Oct 23, 2022, 6:47 PM IST

हैदराबाद : प्रभासच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त ( Prabhas birthday ) रविवारी प्रभासचा चित्रपटातील श्री रामाच्या लूकमधील पोस्टर रिलीज करण्यात ( prabhas upcoming films ) आले. या पोस्टरमधून प्रभासच्या पात्राची खास झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. चित्रपट पुढील वर्षी १२ जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुष चित्रपट थ्रीडीमध्येही पाहण्यास मिळणार आहे.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम 'आदिपुरुष' 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D थिएटरमध्ये रिलीज होत आहे!" असे कॅप्शन प्रभासने चित्रपटातील त्याचा लूक सोशल मीडियावर शेअर करताना दिले ( Prabhas adipurush birthday poster ) आहे. या सिनेमात सैफ अली खान रावणाच्या आणि क्रिती सेनॉन सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मराठमोळा देवदत्त नागेही या सिनेमातील महत्वाचा भाग आहे, तो भगवान हनुमानांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊतचे आहे.

हातात धनुष्यबाण : 'आदिपुरुष' सिनेमात प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील त्याचा नवा लूक समोर आला आहे. यामध्ये प्रभासच्या हातात धनुष्यबाण असून युद्धभूमीवर युद्धासाठी प्रभू श्रीराम तयार आहेत, असं या पोस्टरमधून दाखवण्यात आलं आहे. यामध्ये प्रभू श्रीरामांच्या पाठीमागे आग ओकणारा सूर्य आणि वानरसेना दिसते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.