मुंबई : बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता शायनी आहुजाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बॉम्बे हायकोर्टाने शायनीला त्याच्या पासपोर्टचे १० वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची परवानगी दिली आहे. २००९ रोजी घरामध्येच काम करणाऱ्या मोलकरणी सोबत अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्याला या गुन्ह्यात सात वर्षाची शिक्षा ठोकविण्यात आली, त्यानंतर तो जामिनावर बाहेर आहे. मात्र आता त्याला परदेशात जाण्यासाठी पारपत्र पाहिजे असल्याने अनुमतीची गरज होती यासाठी त्याने एक अनुमती अर्ज उच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता. दरम्यान उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर करत न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एक सदस्य खंडपीठाने दहा वर्षासाठीच्या पासपोर्ट करिता मंजुरीचे आदेश जारी केले आहे. न्यायालयामध्ये पीडित महिलेच्या बाजूने शायनीला पासपोर्टसाठी मंजुरी देऊ नये असा दावा करण्यात आला होता.
शायनी आहुजाला दिलासा : ज्येष्ठ वकील एस. के. हलवासिया यांनी बाजू मांडली की 'आयपीसी ३७६ अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. आता देखील या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपी जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या पासपोर्टसाठी मंजुरी न्यायालयाने देऊ नये, मात्र आरोपीच्या बाजूने वकील करण सिंग राजपूत यांनी न्यायालयापुढे उपलब्ध कागदपत्रे सादर करीत दावा केला की, अशा केसमध्ये इतर ठिकाणी परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट मंजुरी आदेश मिळालेले आहेत. बॉलीवूडच्या कामानिमित्ताने त्याला परदेशी जाण्यासाठी सातत्याने पासपोर्टची गरज आहे. न्यायालयाने या पासपोर्टच्या अर्जाचा विचार करून मंजुरीचे आदेश द्यावे अशी विनंती शायनीच्या पक्षाकडून करण्यात आली होती. न्यायालयाने उपलब्ध तथ्य आधारे शायनीला अखेर दहा वर्षाच्या पासपोर्ट करिता मंजुरी दिली.
शायनी आहुजावर बलात्काराचे आरोप : घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप शायनीवर आहे. याप्रकरणी पीडित महिलेकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना १४ जून २००९ रोजी घडली होती. त्यानंतर रीतसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तपास झाल्यानंतर शायनी हा दोषी ठरला होता. त्यानंतर हा खटला बॉम्बे हायकोर्टमध्ये वर्ग झाला होता. बॉम्बे हायकोर्टात सर्व आरोप सिद्ध झाल्यामुळे त्याला सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा :