ETV Bharat / entertainment

11 Bollywood Couples : वयातील धक्कादायक अंतर असलेली ११ बॉलीवूड जोडपी - बॉलीवूड

प्रेमाबद्दल एक म्हण आहे की 'प्रेम आंधळं असते'. कधी कधी हे आंधळे प्रेम आपल्याला इतके व्यापून टाकते की जोडीदाराच्या वयाच्या फरक आपल्याला पडत नाही. बॉलीवूड इंडस्ट्रीतही अशी अनेक जोडपी आहेत ज्यांच्या वयात खूप अंतर आहे. चला तर जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटीबद्दल...

11 Bollywood Couples
बॉलीवूड जोडपी
author img

By

Published : Jul 1, 2023, 12:20 PM IST

मुंबई: जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा त्याला वय, धर्म, जात किंवा कोणत्याही सीमा दिसत नाहीत. बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की प्रेमाला सीमा नसते. आपण अशाच काही सेलिब्रिटीबद्दल जाणून घेवू ज्यांच्या वयामध्ये धक्कादायक फरक आहे.

दिलीप कुमार आणि सायरा बानो: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी 55 वर्षे एकत्र घालवली. दिलीप कुमार यांनी 7 जुलै 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला. या जोडप्यामध्ये दिवसेंदिवस प्रेम वाढत गेले. हे जोडपे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. सायरा बानो यांनी शेवटच्या दिवसांपर्यंत आजारी दिलीपकुमारची काळजी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी 1966 मध्ये सायरा बानोशी लग्न केले, तेव्हा ते 44 वर्षांचे होते आणि अभिनेत्री फक्त 22 वर्षांची होती. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या वयात २२ वर्षांचे अंतर होते.

दिलीप कुमार आणि सायरा बानो
दिलीप कुमार आणि सायरा बानो

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरशी आधीच लग्न केले होते. त्यानंतर धर्मेंद्र 'तुम हसीन मैं जवान (1970)' च्या सेटवर त्यांची सहकलाकार हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. 1979 मध्ये धर्मेंद्र यांनी वयाच्या 13 वर्षांच्या अंतराने लहान असलेली हेमा मालिनीशी लग्न केले. धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यानंतर दुसऱ्या पत्नीशी लग्न करताना इस्लाम धर्म स्वीकारला होता. धर्मेंद्र यांना हेमा मालिनीसोबत ईशा देओल, अहाना देओल या दोन मुली आहेत.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी

कबीर बेदी आणि परवीन दुसांझ : दिग्गज अभिनेते कबीर बेदी यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी तीसऱ्यांदा लग्न केले होते. त्यांनी परवीन दुसांझसोबत लग्नगाठ बांधल्यावर सर्वांनाच धक्का बसला. जेव्हा त्यांनी परवीनशी लग्न केले तेव्हा ते 40 वर्षांचा होते. या जोडप्याच्या वयामधील अंतर 29 वर्षांचा आहे. कबीर बेदींनी पहिले लग्न प्रोतिमा गौरीशी केले होते, पण मात्र तिचे निधन झाले.

कबीर बेदी आणि परवीन दुसांझ
कबीर बेदी आणि परवीन दुसांझ

संजय दत्त आणि मान्यता: सुपरस्टार संजय दत्त आणि मान्यता यांच्या वयात 19 वर्षांचे अंतर आहे, या जोडप्याने 2008 मध्ये लग्न केले होते. सुपरस्टारची पहिली पत्नी, अभिनेत्री रिचा शर्माचे 1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले. त्यांनी 1987 मध्ये त्यांनी लग्न केले होते. त्यानंतर संजूने मॉडेल रिया पिल्लईशी 1998मध्ये लग्न केले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजय दत्तला त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्रिशाला आणि मान्यता दत्तपासून जुळी मुले अक्रा आणि शाहरान यांच्यासह 3 मुले आहेत. मान्यता काही चित्रपटांमध्ये आयटम गर्ल रूपेरी पडद्यावर दिसली होती.

संजय दत्त आणि मान्यता
संजय दत्त आणि मान्यता

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत: यशस्वी अभिनेता शाहिद कपूरने 7 जुलै 2015 रोजी मीरा राजपूतसोबत लग्न केले, तेव्हा मीरा फक्त 21 वर्षांची होती तर शाहिद कपूर 34 वर्षांचा होता. या जोडप्याच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे. अनेक अफेअर्सनंतर शाहिद कपूरने दिल्लीतील एका मुलीसोबत लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगी मीशा आणि एक मुलगा झेन कपूर आहे. करीना कपूर आणि शाहिदचे अफेअर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अफेअरपैकी एक होते.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत

सैफ अली खान आणि करीना कपूर खान: सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी वयाच्या 12 वर्षांच्या अंतराने लग्न केले. हे जोडपे तैमूर अली खान आणि जेह अली खानचे पालक आहे. तसेच सैफ अली खानला त्याच्या पहिल्या पत्नीपासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान
सैफ अली खान आणि करीना कपूर खान

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर: मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांनी 22 एप्रिल 2018 रोजी वयाच्या 25 वर्षांच्या अंतराने लग्न केले. मिलिंदने 2006 मध्‍ये फ्रेंच अभिनेत्री मायलेन जंपनोईशी पहिल्‍यांदा विवाह केला परंतु नंतर 2009 मध्‍ये घटस्‍फोट झाला. मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांच्या प्रेमविवाहाविषयी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे मिलिंद सोमण हे त्यांच्या सासूपेक्षा वयाने मोठे आहेत. मिलिंद हा एक फिटनेस आयकॉन आहे.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन: माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायने 2002 मध्ये सलमान खानसोबत ब्रेकअप केले आणि त्यानंतर विवेक ओबेरॉयला डेट करायला सुरुवात केली. 2006 मध्ये धूम 2 च्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन तिच्या प्रेमात पडला आणि त्याने ऐश्वर्याला प्रपोज केले. 2007 मध्ये ऐश 33 आणि अभि 31 वर्षांची असताना त्यांचे लग्न झाले. या जोडप्याच्या वयात 2 वर्षांचा फरक आहे. त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन

प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स: 1 डिसेंबर 2018 रोजी, बॉलीवूड सुपरस्टार प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक आणि मॉडेल निक जोन्सशी लग्न केले. या जोडप्याच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. प्रियांका चोप्रा जोन्सने बॉलीवूडमध्ये मोठे स्थान निर्माण केले आणि आता ती काही हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करून एक जागतिक स्टार आहे. ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी महिला स्टार्सपैकी एक आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स
प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर पाच वर्षे डेट केल्यानंतर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया भट्ट रणबीर कपूरपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. या जोडप्याला राहा नावाची एक मुलगी आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

कतरिना कैफ आणि विक्की कौशल : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशलने गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या वयात ५ वर्षांचे अंतर आहे.

कतरिना कैफ आणि  विक्की कौशल
कतरिना कैफ आणि विक्की कौशल

हेही वाचा :

Kareena Kapoor Khan: करीना कपूरचे चित्रपटसृष्टीत 23 वर्षे पूर्ण ; 'रिफ्युजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण...

SUNIL LAHRI : आलिया भट्ट साकारणार सीतेची भूमिका, लक्ष्मण फेम सुनील लाहिरीने दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

DAY 1 BOX OFFICE COLLECTION : 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.