मुंबई - रणवीस सिंगला शनिवारी 'दक्षिण भारतातील सर्वात प्रिय हिंदी अभिनेता' या पुरस्कारसह ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. 10व्या दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान स्वीकारताना रणवीर म्हणाला की, आपल्या भारत देशाच्या चित्रपट उद्योगाला समृद्ध आणि गतिमान बनवणाऱ्या विविधतेचा मला अभिमान आहे.
रणवीर म्हणाला, "फक्त एक कलाकार म्हणून हे करू शकलो याबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. मला जगण्यासाठी जे करायला आवडते ते मला करायला मिळत आहे. हे तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही मला स्वीकारल्यामुळे शक्य झाले आहे, म्हणून तुम्हा सर्वांचे आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला आपला देशाबद्दल आवडतो त्याचे कारण आपल्या संस्कृतीत असलेली विविधता हे आहे. आपण जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देश आहोत. प्रत्येक राज्याच्या संस्कृतीत अशी समृद्धता आणि जिवंतपणा आहे आणि आम्ही लोकांनी ते साजरे केलेच पाहिजे.
तो पुढे म्हणाला, "भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत हा माझा आवडता भाग आहे. एक काळ असा होता जेव्हा भाषेचा अडथळा होता पण आता आपण अशा काळात जगत नाही हे किती आश्चर्यकारक आहे. जसे बोंग जून-हो यांनी ऑस्कर स्टेजवर सांगितले होते की, मला खूप आनंद आणि कृतज्ञ आहे की आम्ही आता अशा काळात आहोत जिथे लोक वेगवेगळ्या भाषा आणि विविध संस्कृतींमधील या सर्वात आश्चर्यकारक कथा सबटायटल्ससह स्वीकारत आहेत."
रणवीर पुढे म्हणाला की, दक्षिणेतील चित्रपटसृष्टी आणि मंत्रमुग्ध करणारी प्रतिभा त्याला प्रेरणा देते. तो म्हणाला, "तुम्ही संपूर्ण आणि पलीकडची कल्पनाशक्ती पकडली आहे आणि हे तुमच्या कलाकुसरीचे आणि प्रामाणिकपणाचे श्रेय आहे. तुम्ही मला प्रेरणा दिली!"
दरम्यान, वर्क फ्रंटवर, रणवीर पुढे रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाच्या 'सर्कस' या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय रणवीरकडे आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' देखील आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.