ETV Bharat / entertainment

Tiger 3 : टायगरनं दिला चाहत्यांना खास संदेश, सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल... - Bollywood bhaijaan Salman Khan

Tiger 3 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच निर्मात्यांनी 'टायगरचा संदेश' रिलीज केला आहे, ज्यामध्ये सलमान खान जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

Tiger 3
टायगर 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 1:28 PM IST

मुंबई - Tiger 3 : सलमान खानचा तिसरा स्पाय थ्रिलर चित्रपट 'टायगर 3' या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. 'टायगर 3' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर खळबळ माजवण्यासाठी दबंग खान सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत कतरिना कैफ दिसणार आहे. दरम्यान आता 'टायगर 3'मधून एक महत्त्वाचा संदेश समोर येत आहे. 'टायगर' फ्रेंचायझीच्या तिसऱ्या पार्टमध्ये सलमान खानचा लूक हा कसा असेल याची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. 'टायगर'चा संदेश हा यूट्यूबवर आता प्रसारीत करण्यात आला आहे.

दिवाळीला प्रदर्शित होणार 'टायगर 3' आहे : हा सलमान खान स्टारर 'टायगर 3' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगूमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'टायगर 3'चा हा खास संदेश टीझरसारखा आहे. या संदेशात त्यानं त्याच्याविषयी घडलेल्या अफवांविषयी सांगितलं आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये चित्रपटातील तीव्र अ‍ॅक्शन सीन्सची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये 'टायगर' एक क्लिप रेकॉर्ड करताना दिसत आहे. या क्लिपमध्ये तो म्हणतो, 'माझे नाव अविनाश सिंह राठौर आहे पण तुम्हा सर्वांसाठी मी टायगर आहे. मी 20 वर्षे भारताच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले. आज २० वर्षांनंतर मी भारताकडून माझे चारित्र्य प्रमाणपत्र मागत आहे. भारत माझ्या मुलाला सांगेल की त्याचा वडील कोण होता? देशद्रोही की देशभक्त? मी जिवंत राहिलो तर मी पुन्हा तुमच्या सेवेत हजर राहीन... नाहीतर जय हिंद. व्हिडिओच्या शेवटी टायगर म्हणतो 'जोपर्यंत टायगर मेला नाही तोपर्यंत टायगर पराभूत होणार नाही' असं या संदेशात सांगितलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'टायगर 3' चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसेल : हा चित्रपट 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण' या सिनेमांपासून प्रेरित असणार आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर 'टायगर 3' हा सलमानचा या तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिना पुन्हा एकदा टायगर आणि झोयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात इम्रान हा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. 'टायगर-3' ची कहाणी समजणं थोडे कठीण जाणार आहे. 'पठाण'मध्ये सलमान खानचा कॅमिओ होता, तर 'टायगर 3'मध्ये शाहरुख खान कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना सलमानची खूप अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. Nayanthara : नयनतारा आणि विघ्नेशनं क्वालालंपूरमध्ये साजरा केला आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस...
  2. Ganpath Teaser Release Date Postponed: टायगर आणि क्रितीच्या 'गणपथ'चं टीझर रिलीज लांबणीवर, निर्मात्यांनी शेअर केलं नवं पोस्टर
  3. Tumse Na Ho Payega screening : 'तुमसे ना हो पायेगा'च्या स्क्रिनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची हजेरी - पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.