ETV Bharat / entertainment

Kartik Aryan and Sara Ali Khan : कार्तिक आर्यनसोबत सारा अली खान करू शकते 'आशिकी 3'मध्ये एंट्री... - कार्तिक आर्यन आणि सारा अली खान

Kartik Aryan and Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या चर्चेत आले आहेत. हे दोघे अनुराग बसूच्या आगामी 'आशिकी 3' चित्रपटामध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसू शकतात.

Kartik Aryan and Sara Ali Khan
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 5:11 PM IST

मुंबई - kartik aryan and sara ali khan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान आता अनुराग बसूच्या आगामी 'आशिकी 3' या चित्रपटासाठी कार्तिकची निवड करण्यात आली आहे. सध्या अनुराग हे कार्तिक आणि साराला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आणण्याची योजना आखत आहेत. चाहत्यांना कार्तिक आणि साराची जोडी खूप आवडते. अलीकडेच, कन्नड अभिनेत्री आकांक्षा शर्मा या चित्रपटामध्ये लीड रोल करण्याची चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळेल असं दिसत आहे. या चित्रपटासाठी साराचं नाव समोर येत आहे. अनुराग सध्या साराच्या टॅलेंटने प्रभावित झाले आहेत.

'आशिकी 3' चित्रपटामध्ये सारा करू शकते एंट्री : कार्तिक आणि सारा यापूर्वी 'लव्ह आज कल 2'मध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. सध्या साराचे नाव 'आशिकी 3'साठी अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. अलीकडेच 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत कार्तिक आणि सारा एकत्र दिसले होते. 'गदर 2' च्या टीमने यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत मोठी पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये एक्स-कपल सारा आणि कार्तिक एकत्र दिसले होते. या पार्टीमधील एका व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन पार्टीनंतर मिठी मारताना दिसले होते. सारा ही कार्तिकची एक्स गर्लफ्रेंड आहे. या एक्स कपलचे ब्रेकअप झाले होते, तेव्हा त्यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले होते.

ब्रेकअपनंतरही चांगली मैत्री : दरम्यान आता सारा आणि कार्तिक ब्रेकअपनंतर चांगले मित्र आहेत. चंदू चॅम्पियनची शूटिंग झाल्यानंतर कार्तिक अनुराग बासूच्या 'आशिकी 3'च्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. सारा शेवटची 'जरा हटके जरा बचके' मध्ये दिसली होती. ज्यामध्ये विक्की कौशलने तिच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

हेही वाचा :

  1. Advance booking : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग....
  2. Gadar 2 and omg 2 box office collection day 25 : 'गदर 2'ने 500 कोटीचा टप्पा केला पार ; 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घसरण...
  3. Dream girl २ box office collection day ११ : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.