मुंबई - Rashmika Mandanna Blind in Love : अभिनेता रणबीर कपूरनं अलिकडेच दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता आगामी 'अॅनिमल' चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनंही अर्जुन रेड्डीचं समर्थन केलंय. 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात विजय देवराकोंडानं मुख्य भूमिका साकारली होती. रश्मिका आणि विजय यांच्यामध्ये डेटिंग सुरू असल्याची चर्चा आहे. 'अॅनिमल' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान रश्मिकानं चित्रपटाबद्दलचा तिचा दृष्टीकोन शेअर केला. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करतेय. यावेळी तिनं 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचं व त्यातील व्यक्तीरेखेचं कौतुक केल्यामुळं सोशल मीडियावर काही लोक नाराज झाले. त्यांनी तीव्र शब्दात रश्मिकावर टीका करायला सुरुवात केली आणि ती विजयच्या 'प्रेमात आंधळी' झाल्याचं म्हटलं.
-
Ranbir coming to beat Shahid Kapoor in who is going to play the biggest misogynistic women beater on screen with #AnimalTheFilm #KabirSingh pic.twitter.com/NCuiknhop4
— Iris 🍉 (@IrisBarryAllen) November 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ranbir coming to beat Shahid Kapoor in who is going to play the biggest misogynistic women beater on screen with #AnimalTheFilm #KabirSingh pic.twitter.com/NCuiknhop4
— Iris 🍉 (@IrisBarryAllen) November 23, 2023Ranbir coming to beat Shahid Kapoor in who is going to play the biggest misogynistic women beater on screen with #AnimalTheFilm #KabirSingh pic.twitter.com/NCuiknhop4
— Iris 🍉 (@IrisBarryAllen) November 23, 2023
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अर्जुन रेड्डी' या 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात विजय देवराकोंडानं पुरुषी अहंकार असलेल्या नायकाची भूमिका साकारली होती. यात हिंसेचाही अतिरेक नायकाकडून झाला होता. याच चित्रपटाचा हिंदीमध्ये 'कबीर सिंग' या नावानं रिमेक बनला होता. यात शाहिद कपूरनं मुख्य भूमिका साकारली होती.
-
#Animal #AnimalTheFilm #KabirSingh pic.twitter.com/FyX4xZtfIl
— Pritam (@myselfpritamm) November 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Animal #AnimalTheFilm #KabirSingh pic.twitter.com/FyX4xZtfIl
— Pritam (@myselfpritamm) November 23, 2023#Animal #AnimalTheFilm #KabirSingh pic.twitter.com/FyX4xZtfIl
— Pritam (@myselfpritamm) November 23, 2023
'गीता गोविंदम' या चित्रपटामध्ये विजय देवराकोंडासोबत भूमिका केलेल्या रश्मिका मंदान्नानं 'अर्जुन रेड्डी'चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. 'अर्जुन रेड्डी'चं कथानक मूळतः हिंसक नव्हतं असं ती म्हणाली. तिनं 'अॅनिमल' आणि 'अर्जुन रेड्डी'तील व्यक्तीरेखांमध्ये साम्य असल्याचं सांगितलं.
रश्मिका मंदान्ना म्हणाली, "जेव्हा मी कबीर सिंग किंवा अर्जुन रेड्डी चित्रपट पाहिला, तेव्हा मला वाटलं नाही की ते हिंसक चित्रपट आहेत. ते 'हाय इंटेंसिटी' असलेले चित्रपट होते. अॅनिमलचंही तेच आहे, इथेही तुम्हाला थोडीशी हिंसा दिसते. चित्रपटात भावनाही जास्त आहेत. संदीप वंगा रेड्डी हे एक दिग्दर्शक म्हणून, एक 'अनपोलॉजेटिक रियल' आहेत. लोक स्क्रिनसाठी वेगळा बुरखा परिधान करतात मात्र संदीप तसे वागत नाहीत."
संदीप रेड्डी वंगा यांच्या प्रमुख व्यक्तींचा बचाव करणारा रश्मिकाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, नेटिझन्सने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू केला. तिच्यावर भरपूर टीका करणाऱ्या कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या. ती प्रेमात आंधळी झाल्याचंही अनेकांनी म्हटलंय. महिलांवरील आक्रमकतेबद्दल आणि लैंगिक भाषा वापरलेल्या चित्रपटाचं ती समर्थन करत असल्याचंही काहींनी म्हटलंय.
यापूर्वी एका मुलाखतीत रणबीर कपूरनंही 'अर्जुन रेड्डी'चं कौतुक केलं होतं आणि शक्तिशाली आणि प्रभावशाली चित्रपट असल्याचं म्हटलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यंही तो म्हणाला होता.
'अॅनिमल' हा एक क्राइम थ्रिलर आहे. यामध्ये करणीर कपूर आणि रश्मिका मंदान्नासह अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असलेल्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटासोबत टक्कर होणार आहे.
हेही वाचा -
2. 'अॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर दिसतोय संजू बाबा; पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया