मुंबई - आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री काजोलचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. अभिनेता अजय देवगनसोबत तिचा सुखाचा संसार सुरू असून त्यांचा हसऱ्या घरात न्यासा व युग हे दोन सुंदर अपत्ये आहेत. अजय आणि काजोल एकमेकांना भेटण्यापूर्वी ते दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. काजोलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या भन्नाट अशा लव्हस्टोरीबद्दल...
काजोलने बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: शाहरुखसोबतची तिची जोडी आजही चाहत्यांच्या काळजात घर करुन आहे. 'कुछ कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'बाजीगर' यांसारख्या बऱ्याच चित्रपटातील तिच्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. तिच्या करिअरच्या सुवर्णकाळात तिने अभिनेता अजय देवगनसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. ९० च्या दशकात दोघांची 'हलचल' चित्रपटादरम्यान ओळख झाली.
सिनेमाचे कथानकही फिके पडले अशी अजय-काजोलची प्रेमकहानी - काजोल 1995 मध्ये हलचलच्या सेटवर त्याच उत्साही आणि उर्जेने पोहोचली ज्यासाठी ती ओळखली जाते. शूटच्या आधी ती विचारते माझा हिरो कुठे आहे? यावर तिथे उपस्थित असलेली व्यक्ती चित्रपटाच्या नायकाकडे म्हणजेच अजय देवगणकडे बोट दाखवते. इथे तिला चित्रपटाचा नायक दिसतो.. एक हिरो जो स्वतःमध्ये मस्त आहे. कॉफी पीत लोकांचे निरक्षण करत आहे. शूटिंग सुरू होण्यापूर्वी दोघे हस्तांदोलन करतात. दोघे थोडा वेळ बोलतात. त्या संभाषणानंतर काजोलला समजते की अजय देवगण शांत आहे आणि संवेदनशील मनाचा माणूस आहे.
मैत्रीपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमकथेचा हा पहिला टप्पा होता. ते इथे जस्ट फ्रेंड झाले होते. शुटिंगच्या काही महिन्यांत त्यांच्या मैत्रीचे रंग गडद होऊ लागले. दोघेही आधीच कोणाकोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होते. दोघांमधील बहुतेक संवाद एकमेकांना त्यांच्या नात्याची कहाणी सांगण्यातच गेला.
मग असा दिवस आला जेव्हा दोघांचे आपापल्या जोडीदारासोबत ब्रेकअप झाले. इथून दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. हळूहळू जवळीक प्रेमात बदलू लागली. एक गोष्ट स्पष्ट होती की दोघेही एकत्र राहणार होते, पण दोघांनीही एकमेकांना प्रपोज केले नाही.
दोघांमधील प्रेम वाढत गेल्याने रात्रीचे जेवण आणि लाँग ड्राईव्हची प्रक्रिया सुरू झाली. अजय देवगण जुहू आणि काजोल दक्षिण बॉम्बेमध्ये राहत होती, त्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपचा बराच वेळ कारमध्ये गेला. सर्व काही वर्षानुवर्षे चालले होते आणि कोणालाही त्याबद्दल माहिती देखील नव्हती.
प्रेमानंतर लग्नाचा टप्पा जवळ येऊ लागला, पण मित्रांच्या सल्ल्यानंतरही ना या प्रवासाचा वेग कमी झाला ना तो उत्साह. काजोलच्या मैत्रिणींना तिचा आणि अजय देवगणचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे काजोलच्या मैत्रिणींनी तिला सल्ला दिला की विचार कर, अजय देवगण खूप शांत माणूस आहे, पण काजोलला चांगलेच माहित होते की तिचे आणि अजयचे नाते किती खास आहे.
अखेर 4 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नही अगदी साधेपणाने व मराठमोळ्या पद्धतीने लग्न झाले होते दोन्ही बाजूच्या पाहुण्यांसह एकूण 15-16 लोक जमले होते.
अजय काजोलचा ४० दिवसांचा हनिमून - लग्नानंतर हनिमूनचे नियोजन करण्यात आले. तेही पूर्ण २ महिन्यांसाठी. हनिमून प्लॅनमध्ये नवीन जोडप्याचे स्वप्न असलेल्या सर्व ठिकाणांचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया, लास वेगास, लॉस एंजेलिस वगैरे. हनिमूनच्या सुट्टीचा 40 वा दिवस होता. ते ठिकाण ग्रीस होते. अजय देवगण सकाळी उठतो आणि काजोलला म्हणतो, मला ताप आला आहे. काजोल त्याला औषध घेण्यास सांगते, पण एवढ्या लांबच्या हनीमूनमुळे त्रस्त झालेला अजय म्हणाला, मला घरी म्हणजे मुंबईला जायचे आहे. अशा प्रकारे त्यांनी ४० दिवसांचा हनिमून अखेर आटोपता घेतला. आज लग्नाला दोन दशके लोटल्यानंतरही या दोघांची लोकप्रियता कमी झालेली नाही. दोघेही प्रत्येक पावलावर एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत.
लग्नांनंतरही काजोलने अजयसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' हे त्यांचे एकत्र केलेले चित्रपट आहेत. त्यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी मानली जाते. अलिकडेच तान्हाजी या चित्रपटात अजयसोबत मराठमोळ्या वेशात काजोल मोठ्या पडद्यावर अवतरली होती.
हेही वाचा - 'मानलेल्या भावा'सोबत पत्नी निशा रावलचे अफेअर असल्याचा करण मेहराचा आरोप