ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT Season 2 : सलमान खान होस्ट करणार बिग बॉस ओटीटी सीझन 2 - 17 जूनपासून प्रसारित

बिग बॉस ओटीटी 2 सीझन सलमान खान होस्ट करणार आहे. हा शो 17 जूनपासून सुरू होणार आहे. या शोचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे.

Bigg Boss OTT Season 2
बिग बॉस ओटीटी 2 सीझन
author img

By

Published : Jun 7, 2023, 12:50 PM IST

मुंबई: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आता बिग बॉस ओटीटीवर दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. मोठ्या पडद्यापासून ते टीव्हीच्या जगतात 'भाईजान'ने नाव कमविले आहे. त्याच्या होस्टिंगला प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिले आहे. आता सलमान 'बिग बॉस बिग बॉस ओटीटी 2चाही भाग होणार आहे. आता सलमानच्या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये कलाकार मस्ती करताना दिसत आहेत. यासोबतच स्ट्रीमिंगची तारीखही समोर आली आहे. यामध्ये सलमान सिल्व्हर जॅकेट घातलेला दिसत आहे. शिवाय या प्रोमोमध्ये शेवटी सांगण्यात आले आहे की हा शो 17 जूनपासून प्रसारित होणार आहे.

जीओ सिनेमावर मोफत बघा बिग बॉस ओटीटी सीझन 2 : बिग बॉस ओटीटी 2 बघण्याचा आनंद जीओ सिनेमावर मोफत घेता येणार आहे. या शोबद्दलच्या काही स्पर्धकांबद्दलचे तपशील अद्याप गुपित आहेत. 'बिग बॉस ओटीटी'चा पहिला भाग चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता. प्रेक्षकांना करणची होस्टिंग थोडी आवडली, त्यामुळे आता या जागी सलमान खान प्रेक्षकांना होस्टिंग करतांना दिसणार आहे. सलमानने दुसऱ्या सीझनमध्ये करणची जागा घेतली आहे, त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना ही मेजवाणीच असल्यासारखी असणार आहे. शोच्या स्पर्धकांच्या यादीबद्दल सांगायचे तर, बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध स्टार्स दिसणार आहेत. 'बिग बॉस'च्या घरात कैद झालेल्या स्टार्सच्या यादीत आदित्य नारायण, पूनम पांडे, अंजली अरोरा, पूजा गौर, आवेज दरबार, अनुराग डोवाल, पलक पुरस्वानी, केविन अल्मासिफर, मुनावर फारुकी राजीव सेन आणि महेश पुजारी यांची नावे आहेत. आणखी काही नावे समोर येण्याची बाकी आहे. बिग बॉस ओटीटी हा लोकप्रिय भारतीय रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसचा स्पिन ऑफ आहे. या शोचा पहिला सीझन 'वूट' वर प्रसारित करण्यात आला होता. आता दुसरा सीझन हा जीओ सिनेमावर बघायला मिळणार आहे.

वर्कफ्रंट : दरम्यान सलमान खानच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर तो शेवटी 'किसी का भाई किसी जान' या चित्रपटात दिसला होता. तसेच तो टाइगर 3 या चित्रपटात कॅटरिना कैफसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळी 2023 ला रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Lust Stories 2 Teaser : 'लस्ट स्टोरीज २'मध्ये तमन्नासह विजय वर्माची दिसणार केमिस्ट्री, नेटफ्लिक्सवर टीझर प्रदर्शित
  2. Shreyas Talpade reveals : बहुतेक चित्रपटासाठी दुसरी निवड असल्याचा श्रेयस तळपदेने केला खुलासा
  3. Ileana D'Cruz : बेबीमून एन्जॉय करत आहे इलियाना डिक्रूज, बिकिनीने फ्लॉन्ट केले बेबी बंप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.