ETV Bharat / entertainment

Bigg boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमधील स्पर्धक वरथूर संतोषला झाली अटक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण... - बिग बॉस कन्नड सीझन 10

Bigg boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमधील स्पर्धक वरथूर संतोषला अटक करण्यात आली आहे. 'बिग बॉस कन्नड'मध्ये त्यानं वाघाच्या पंजाच्या नखानपासून बनवलेले लॉकेट परिधान केले, त्यानंतर ही कारवाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

Bigg boss 10
बिग बॉस कन्नड 10
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 4:54 PM IST

मुंबई - Bigg boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमध्ये दिसणारा स्पर्धक वरथूर संतोष अडचणीत सापडला आहे. शोच्या मध्यावर त्याला अटक करण्यात आली. वरथूर संतोष 'बिग बॉस कन्नड'मध्ये वाघाच्या पंजाच्या नखानपासून बनवलेले लॉकेट परिधान करताना दिसला होता. यावर वनविभागाच्या पथकानं त्याच्यावर कारवाई केली असून शोमध्ये जाऊन वरथूर संतोषला अटक केली आहे. वरथूर विरुद्ध अजामीनपात्र कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरला वन विभागाची टीम बिग बॉस कन्नड 10च्या सेटवर पोहोचली होती. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिग बॉसच्या घरात जाऊन वरथूर संतोषला लॉकेट आणण्यास सांगितले.

'बिग बॉसमधील कन्नड' स्पर्धकाला झाली अटक : तपासादरम्यान वरथूर संतोषनं घातलेल्या लॉकेट हे वाघाच्या पंजाच्या नखाचे असल्याचे सिद्ध झाले. यावेळी वनविभागाच्या टीमनं 'बिग बॉस कन्नड' निर्मात्यांना वरथूरला त्यांच्या ताब्यात देण्यास सांगितले. काही तासांनंतर वरथूर हा 'बिग बॉस कन्नड'च्या घरातून बाहेर आला. त्यानंतर वनविभागाच्या टीमनं त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उप वनसंरक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितलं की, संतोषनं वाघाच्या पंजाच्या नखांचे लॉकेट घातल असल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे. ही सार्वजनिक तक्रार असून तक्रारीनंतर, आम्ही तपासासाठी कोमाघट्टाजवळील 'बिग बॉस स्टुडिओ'मध्ये गेलो होतो. त्यानंतर त्याला लॉकेट मागण्यात आले. त्यानं हे लॉकेट हे अधिकाऱ्यांना विचारविनिमय केल्यानंतर सोपवले.

वरथुर संतोषबद्दल : वरथूर संतोष हा शेतकरी असून तो पशुपालन करतो. वरथूर हा गायींच्या सुरक्षेची काळजी घेत असताना देखील दिसतो. याशिवाय तो इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा त्याच्या पशुपालनाचे व्हिडिओही शेअर करत असतो. आता याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. वाघाच्या खऱ्या नखांपासून बनवलेले लॉकेटची पुष्टी झाली आहे. कायद्यानुसार वाघाचे पंजाचे नखे कोणीही विकत किंवा विकू शकत नाही. हा गुन्हा खूप गंभीर असल्यानं त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

हेही वाचा :

  1. Ganapath Box Office Collection Day 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'गणपथ' बॉक्स ऑफिसवर कमाईच्याबाबतीत ठरला अपयस्वी...
  2. Tiger 3 Song Out : 'टायगर 3'च्या डान्स नंबरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफमध्ये दिसली जबरदस्त केमिस्ट्री...
  3. Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मानं पती विराट कोहलीसाठी केली 'ही' पोस्ट...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.