ETV Bharat / entertainment

Sana Khan welcome baby boy : बिग बॉस 6 फेम सना खान आणि पती मुफ्ती अनसच्या घरी पाळणा हलला, पाहा अॅनिमेटेड व्हिडिओ - सना खानने शेअर केला एनिमेटेड व्हिडिओ

माजी अभिनेत्री बिग बॉस 6 फेम सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनस यांनी बुधवारी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. या जोडप्याने १७ मार्च रोजी सोशल मीडियावरुन त्यांची गुड न्यूज शेअर केली होती.

Sana Khan welcome baby boy
सना आणि मुफ्ती अनस
author img

By

Published : Jul 6, 2023, 12:34 PM IST

मुंबई - हिंदी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटाची प्रसिद्ध माजी अभिनेत्री बिग बॉस 6 फेम सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनस यांनी बुधवारी ५ जुलै रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे मुलाचे स्वागत केले. या जोडप्याने २१ नोव्हेंबर २०२० रोजी सूरतमध्ये लग्न केले होते. सना खानने १७ मार्च रोजी सोशल मीडियावर गरोदरपणाची घोषणा केली होती. आता सना आणि मुफ्ती अनस यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली आहे.

सना खानने शेअर केला एनिमेटेड व्हिडिओ - सना खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्स आणि चाहत्यांसाठी तिच्या मुलाच्या जन्माची माहिती दिली. सना आणि मुफ्ती अनस यांनी कॅप्शनसह एक एनिमेटेड व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांनी मुलाच्या आगमनाबद्दल अल्लाहचे आभार मानले आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांनाही त्यांनी दुआ केल्याबद्दल धन्यावाद दिले आहेत.

सना खान आणि मुफ्ती अनसवर अभिनंदनाचा वर्षाव - सना आणि मुफ्ती अनस यांनी त्यांच्या मुलाच्या आगमनाची पोस्ट शेअर करताच, चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी नव्याने आई वडील बनलेल्या जोडीचे अभिनंदन केले. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये सना आणि मुफ्ती यांना त्यांच्या मुलासाठी शुभेच्छा दिल्या. सना खान ही एक माजी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे जी अनेक रियालिटी शो , डेली सोप ऑपेरा आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.

मनोरंजन व्यवसाय सोडून लोककल्याणाला वाहून घेतले - सना खानने लोकांना मदत करण्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० रोजी फिल्म आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री सोडण्याचा तिचा निर्णय उघड केला आणि त्या दिवशी तिने स्वतःला पूर्णपणे निर्मात्याच्या स्वाधीन केले. बिग बॉस ६ मधील प्रसिद्ध अभिनेत्री सना खानने तिच्या कारकिर्दीत खतरों के खिलाडी सीझन ६ सह अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिीला आहे. तिने जय हो, वजा तुम हो, टॉयलेट: एक प्रेम कथा, आणि यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याकाळात तिने आपल्या कामातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

हेही वाचा -

१. Spkk Box Office Collection Day 7 : 'सत्यप्रेम की कथा'ने 50 कोटींचा आकडा पार केला, एका क्लिकवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन पहा

२. Prabhas Salaar Teaser Out : प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित, काही तासात दोन लाक्षांपेका व्हूज

३. Rakhi Sawant : शाहरुख खानच्या दुखापतीवर राखी सावंतची अनपेक्षित प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.