मुंबई - Isha vs Abhishek cat fight : वादग्रस्त टीव्ही शो 'बिग बॉस 17' च्या स्पर्धकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही धक्कादायक रहस्ये या शोद्वारे उघड केली आहेत. ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा या शोदरम्यान झाल्या आहेत. शोमध्ये येण्यापूर्वीच ईशानं अभिषेकवर अनेक आरोप केले होते. यावेळी पुन्हा एकदा ईशानं शोमध्ये तिच्या पूर्वीच्या नात्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. ईशाने सांगितलं की, मी एका पार्टीमध्ये मोबाईलवर टाईप करून कोणालातरी सांगत होते की, माझा बॉयफ्रेंड असा आहे. अभिषेकनं मला विचारलं की, तुझे इतके मित्र आहेत का? मी त्यावेळी हो म्हणाले या मुलींना मी ओळखते. यानंतर मी काही बोलण्यापूर्वीच अभिषेकनं मला जोरदार झापड मारली''.
-
#IshaMalviya mentioning an incident from outside how #AbhishekKumar SLAPPED her when he came to know how many friends she had in a club 💀🤯#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/PavcsdrU8O
— Rachit (@rachitmehra_2) December 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#IshaMalviya mentioning an incident from outside how #AbhishekKumar SLAPPED her when he came to know how many friends she had in a club 💀🤯#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/PavcsdrU8O
— Rachit (@rachitmehra_2) December 12, 2023#IshaMalviya mentioning an incident from outside how #AbhishekKumar SLAPPED her when he came to know how many friends she had in a club 💀🤯#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/PavcsdrU8O
— Rachit (@rachitmehra_2) December 12, 2023
ईशा मालवीय केला धक्कादायक खुलासा : त्या झापडनं माझ्या डोळ्याखालील भाग काळानिळा पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सेटवर गेल्यावर आईला कळलं की हे अभिषेकमुळेच झालं आहे. ईशाचे हे शब्द ऐकून विकीला धक्काच बसला. ईशा आणि अभिषेक सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात आहेत. शोमध्ये येण्यापूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला होता. अभिषेकच्या आक्रमक वर्तनामुळे ईशानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता ईशा समर्थ जुरेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. समर्थ सध्या बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालत आहे. ईशा ही 'बिग बॉस 17'मध्ये बऱ्याचदा अभिषेकसोबत वाद करताना दिसते.
ईशा आणि अभिषेकचा ब्रेकअप : ईशा आणि अभिषेकनं 'उडारिया' या शोमध्ये एकत्र काम केलं आहे. यादरम्यान दोघे रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झालं. 'बिग बॉस 17' शोच्या पहिल्याच दिवशी ईशानं सलमान खानला सांगितलं होतं की अभिषेकसोबतच्या तिच्या नात्यात ती खूश नव्हती, कारण तो खूप नकारात्मक आणि खूप संशय घेणार होता. 'बिग बॉस 17' मध्ये सर्वच स्पर्धक चांगली कमगिरी करत आहेत. यामध्ये अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आणि मुनावर फारुकी हे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत आहेत. या आठवड्यात सर्व लोकप्रिय स्टार बिग बॉस शोमध्ये नॉमिनेट झाले आहेत.
हेही वाचा :