ETV Bharat / entertainment

'वीकेंड का वार'वर सनी लिओनीची झाली एंट्री, वाइल्डकार्ड एंट्री म्हणून ओरी बिग बॉसच्या घरात दाखल - अंकिता लोखंडे आणि विकी जैन

Bigg Boss 17 :'बिग बॉस 17'च्या शनिवारच्या 'वीकेंड का वार'मध्ये, सनी लिओन तिच्या 'थर्ड पार्टी' गाण्याच्या प्रमोशनसाठी आली होती. याशिवाय वाइल्डकार्ड एंट्री म्हणून ओरी बिग बॉसमध्ये दाखल झाला आहे.

Bigg Boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 3:26 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 : रविवारी प्रसारित झालेल्या 'बिग बॉस 17' च्या 'वीकेंड का वार'मध्ये सनी लिओनी तिच्या आगामी 'थर्ड पार्टी' गाण्याच्या प्रमोशनसाठी अभिनेता अभिषेक सिंहसोबत आली होती. याशिवाय ओरहान अवात्रामणि ज्याला ओरी म्हणूनही ओळखले जाते, त्यांची 42 व्या एपिसोडमध्ये वाइल्डकार्ड एंट्री झाली आहे. दरम्यान यावेळी सनी लिओननं बिग बॉसच्या घरातील सदस्यासोबत संवाद साधला. यावेळी सनीनं ईशाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले. ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये लव्ह ट्रँगल सध्या पाहायला मिळत आहे. याशिवाय बिग बॉसनं विकी आणि अंकिताच्या कुटुंबातील सदस्यांना देखील 'वीकेंड का वार'मध्ये आमंत्रित केले आहे.

विकीच्या आईने भांडण न करण्याचा सल्ला दिला : विकी आणि अंकिता या जोडप्यामध्ये रोजचं शोमध्ये भांडण पाहायला मिळते. त्यांचा संघर्ष इतका शिगेला पोहोचला आहे की, त्यांना समजून सांगण्यासाठी बिग बॉसनं त्यांच्या आईला 'वीकेंड'ला खास आमंत्रण देऊन बोलावलं. नुकताच एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. अंकिता आणि विकी जैन यांची आई त्यांना समजावून सांगण्यासाठी बिग बॉसमध्ये आल्या आहेत. आईला पाहून दोघीही भावूक होतात. प्रोमो व्हिडिओमध्ये जोडपे भावूक होतात आणि म्हणतात, 'आई लव्ह यू आई मिस यू विकीची आई दोघींना म्हणते की, 'तुम्ही आपल्या घरी कधीच भांडले नाहीत आणि इथे तुम्ही दोघेही एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं भांडता. पुढं त्यांनी म्हटलं, एकमेकांवर प्रेम करा.' चांगल बोला आणि दिवसामधून एक तरी तास स्वत:ला द्या.

खानजादी शो सोडणार का? : शोचा आणखी एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खान खानजादीवर नाराज झाला आहे. प्रोमोमध्ये एका टास्कदरम्यान खानजादी आणि जिग्ना वोरा यांच्यात वाद झाल्याचे दिसून येते. ज्यामध्ये सलमान खान खानजादीला गप्प करतो आणि म्हणतो, 'पुरे झालं तूझ.' यावर खानजादी उत्तर देते, मी शारीरिक आरोग्याबद्दल ऐकू शकत नाही. तेव्हा सलमान खान म्हणतो, 'तुम्ही शारीरिक आरोग्याबद्दल यापूर्वी बोलल्या आहेत. त्यानंतर खानजादी रडत म्हणते, ' मला घरी जायचे आहे.’ सलमान तिला खडसावतो आणि म्हणतो, ‘जा'. त्यानंतर ती धावत घरामध्ये जाते आणि किंचाळते. आता ती हा शो सोडणार हे येणाऱ्या एपिसोडमध्ये समजेल.

हेही वाचा :

  1. सलमान खानलाच वाचवायला सांग! पंजाबी गायकाच्या बंगल्यावर गोळीबार करत लॉरेन्स बिश्नोईची धमकी
  2. अगस्त्य नंदासोबत केलेल्या डान्समुळं सुहाना खान झाली ट्रोल, पाहा व्हिडिओ

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू, शो झाले हाऊसफुल्ल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.