ETV Bharat / entertainment

बिग बॉस 17मध्ये आला अंकिता लोखंडेच्या गर्भधारणेचा टेस्ट रिपोर्ट - अंजली अरोराची होईल एंट्री

Ankita lokhande :'बिग बॉस 17'मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं प्रेग्नेंसी टेस्ट केली होती. तिचा प्रेग्नेंसी रिपोर्ट आता समोर आला आहे.

Ankita lokhande
अंकिता लोखंडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 2:15 PM IST

मुंबई - Ankita lokhande : अलीकडेच अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17'च्या घरात गर्भधारणा चाचणी केली. त्यानंतर आता तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की ती खरोखरच गर्भवती आहे की नाही. आता यावर एक अपडेट समोर आली आहे. या प्रेग्नेंसी टेस्टनंतर अंकिता लवकरच या शोला टाटा बाय बाय करणार असल्याचं समोर आलं होत. अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. अलीकडेच, इंस्टाग्रामवर एका फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये अंकिता म्हणते की, 'मला वाटते की मी आजारी आहे. माझी तब्येत बरी नाही. मला मासिक पाळी येत नाही. मला घरी जायचे आहे'. त्यानंतर अनेकांना वाटल की ती प्रेग्नेंट आहे. दरम्यान 'बिग बॉस 17'च्या घरातील सदस्यांनी बिग बॉसवर विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना अतिरिक्त सुविधा दिल्याचा आरोप केला होता.

अंजली अरोराची होईल एंट्री : बिग बॉसमध्ये या आठवड्यात सहा स्पर्धकांचं नामांकन झालं आहे, ज्यामध्ये अंकिता लोखंडे, सना रईस खान, जिग्ना व्होरा, अनुराग डोवाल आणि तहलका हे रेड झोनमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंजली अरोरा लवकरच बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड एंट्री म्हणून प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एक पोस्टही व्हायरल होत आहे. अंजली अरोराची एंट्री झाल्यानंतर या शोमध्ये मुनावर फारूकीसोबत तिची केमिस्ट्री चांगली राहिल की नाही, याबद्दल अनेकजण उत्सुक आहे. कारण यापूर्वी दोघेही लॉकअपमध्ये दिसले होते. या शोचा विजता मुनावर होता.

बिग बॉस 17 मध्ये अंकिता करते चाहत्यांचं मनोरंजन : 15 ऑक्टोबरला 'बिग बॉस 17' सुरू होऊन सहा आठवडे झाले आहेत. सुरुवातीला अंकिताचा खेळ समजत नव्हता आणि आता ती घरातमध्ये प्रत्येक टाक्समध्ये तिचा 100 टक्के देण्याचा प्रयत्न करते. अंकिता आणि पती विकी जैनसोबत अनेकदा भांडताना दिसते. विकी जैनला 'बिग बॉस 17 'मध्ये मास्टर माईंडचा टॅग मिळाला आहे. अलीकडेच ओरहान अवतरमणि उर्फ ओरीनं 'बिग बॉस 17'मध्ये प्रवेश केला आहे. ओरी एक लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे आणि अनेक स्टार किड्सचा मित्रही आहे.

हेही वाचा :

  1. अखेर प्रतीक्षा संपली! कंतारा : चॅप्टर 1 चा फर्स्ट लूक होणार लॉन्च
  2. 'टायगर 3'च्या यशानंतर सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक जाहीर
  3. 'बाळाचा बाप कोण?' हे सांगणारा फोटो शेअर करुन इलियाना डिक्रूझनं केलं चकित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.