मुंबई Bigg Boss 17 Update : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन 'बिग बॉस 17'मध्ये प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात हे जोडपं अनेकदा भांडताना दिसतं. या जोडप्याच्या नात्यामध्ये दुरावा येताना सध्या दिसत आहे. नुकत्याच झालेल्या भांडणातून त्यांच्या नात्याचे सत्य समोर येत आहे. 'बिग बॉस 17'च्या आगामी एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात भांडण झालेलं दिसेल. ज्यामध्ये अंकितानं उघड केलं की ती तिच्या पतीकडून निराश झालं आहे. जेव्हा अंकिता तयार होते, तेव्हा मन्नारा चोप्रा आणि ईशा मालवीय या तिच्या लूकबद्दल तिचं कौतुक करतात. यावेळी तिथे अंकिताचा पती विकी जैन देखील उपस्थित असतो.
अंकिता झाली विकीवर नाराज : मन्नारा अंकिताला हॉट म्हणते तर, विकी यावर म्हणतो की त्याची पत्नी त्याला फक्त क्यूट वाटते. पतीकडून कोणतंही कौतुक न झाल्यामुळं संतापलेली अंकिता म्हणते की, ''माझा नवरा कसा आहे हे मला माहीत आहे. त्याचं लक्ष दुसऱ्या मुलींकडे असतं. तो फक्त इतरांची स्तुती करण्यात व्यग्र असतो.''त्यानंतर अंकिता पुढं म्हणते की, ''मी एक निर्णय घेतला आहे आणि मी बाहेर गेल्यानंतर तुला सांगेन. त्यानंतर मी बालीला जाईन.''यावर विकी म्हणतो की, ''लवकरच निर्णय घे जेणेकरून तुला बालीला जाता येईल.'' या गोष्टीवर अंकिताही नाराज होऊन जाते. यानंतर अंकिता आणखी चिडते आणि रागाच्या भरात विकीला म्हणते की, ''मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन.'' यानंतर विकी हा तिला समजून सांगताना दिसतो.
नॉमिनेशनचा प्रोमो : 'बिग बॉस 17' आगामी एपिसोडमध्ये दुसऱ्या एका प्रोमोत नॉमिनेशन होताना दिसत आहे. या आठवड्यात नामांकित स्पर्धक आयशा खान, औरा, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मुनावर फारुकी आणि अरुण माशेट्टी आहेत. 'बिग बॉस' घरात मुनावर अरुण माशेट्टीमध्ये मोठा वाद पाहिला मिळाला. मुनावर हा नॉमिनेशन दरम्यान अरुणला म्हणतो की, ''मला तुझ्यापासून खूप कंटाळा आला आहे.'' यानंतर जेव्हा अरुण मुनावरला नॉमिनेट करतो, तेव्हा यांच्यात मोठा वाद होतो.
हेही वाचा :