मुंबई : सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'तेरे नाम' हा २००३ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत निरागस दिसणारी मुलगी भूमिका चावलाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर ती रातोरात 'स्टार' झाली. या चित्रपटानंतर भूमिका चावलाच्या करिअरला चांगलाच वेग मिळाला. त्यानंतर भूमिकाला अनेक चित्रपटांची ऑफर्स मिळू लागल्या. तिने 'तेरे नाम'नंतर अनेक चित्रपटामध्ये काम केलं, मात्र तिला अपेक्षेइतकी प्रसिद्धी रूपेरी पडद्यावर मिळाली नाही. भूमिका चावला आज तिचा ४५ वाढदिवस साजरा करतेय. भूमिका चावलाने पावडरच्या जाहिरातीतून ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं.
भूमिका चावलाबदल : भूमिका चावलाचा जन्म १९७८ मध्ये दिल्लीत झाला. भूमिकाचे वडील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भूमिका तिच्या ३ भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. तिचा भाऊही भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. वडील सैन्यात असल्यामुळे भूमिका चावलाचं शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. दरम्यान काही वर्षांपासून भूमिका चावला ही लाइम लाईटपासून दूर आहे. आता अलीकडेच ती सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली. या चित्रपटात ती पूजा हेगडेच्या वहिनीच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर भूमिका आता बरीच बोल्ड झाली आहे.
टीव्हीवरील जाहिरातीतून ओळख मिळाली : भूमिकाने दिल्लीतून करिअरला सुरुवात केली. ग्लॅमरच्या दुनियेत यशाची स्वप्ने पाहत भूमिका चावला १९९७ मध्ये मुंबईत आली. त्यानंतर भूमिकाने म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तिने पावडरच्या जाहिरातीत काम केलं आणि तिला चांगलीच प्रसिद्ध मिळाली. भूमिका चावलाला या जाहिरातीतून बरीच ओळख मिळाली. यानंतर भूमिका साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. २००० मध्ये तिने 'युवाकुडू' या साऊथ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तेलगू सिनेमात दिसल्यानंतर, भूमिकाने हिंदी सिनेमात पाऊल ठेवलं. ती २००३ रोजी 'तेरे नाम' चित्रपटात सलमान खानसोबत दिसली. 'तेरे नाम'नंतर भूमिका 'रन', 'सिलसिले', 'दिल ने जिस अपना कहा' आणि 'दिल जो भी कहे' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसली, मात्र तिला फारसे यश मिळालं नाही. हिंदी चित्रपटांमध्ये तिला चांगली प्रसिद्धी मिळत नसल्याने ती पुन्हा एकदा साऊथ चित्रपटसृष्टीत परतली. पण तिथेही तिला विशेष काही करता आले नाही. भूमिकाने तिच्या करिअरमध्ये ६४ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. भूमिकाचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर भूमिकाचे १.४ मिलियनहून अधिक चाहते आहेत.
हेही वाचा :