ETV Bharat / entertainment

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर भूमी बनणार पर्यावरण रक्षक ; वाढदिवसानिमित्य घेतला खास निर्णय... - महत्त्वाचा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Bhumi Pednekar
भूमी पेडणेकर
author img

By

Published : Jul 18, 2023, 4:28 PM IST

मुंबई : १८ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. भूमीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. याशिवाय ती एक पर्यावरणप्रेमी देखील आहे. भूमी अनेकदा पर्यावरणासंबंधित आपल्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. भूमीने वाढदिवासच्या खास दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यात ती 'द भूमी फाउंडेशन' सुरू करणार आहे. भारतातील प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.

भूमी पेडणेकर घेतला मोठा निर्णय : भूमी पेडणेकरने यासंबंधित म्हटले, 'खरा बदल तेव्हाच घडू शकतो जेव्हा आपण आपल्या कृतीची जबाबदारी घेण्यास सुरुवात करू आणि समाज आणि मानवतेसाठी योग्य गोष्टी करण्यासाठी पुढे जाऊ. मला आपली पृथ्वी वाचवण्यासाठी काम करायचे आहे, तसेच येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले वातावरण निर्माण करून द्यायचे आहे. पुढे तिने म्हटले, ज्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे, अशा लोकांना सक्षम बनवून भूमी फाउंडेशन पर्यावरणाचे रक्षण करण्यात मोठी भूमिका बजावू शकली, तर मला याबद्दल खूप आनंद होईल.' तसेच तिने पुढे सांगितले, 'भूमी फाउंडेशन सुरू करण्याच्या दिशेने काम करताना मला आनंद वाटत आहे आणि तेही माझ्या वाढदिवसानिमित्त, यापेक्षा विशेष काहीही असू शकत नाही. माझ्या नावाचा अर्थ पृथ्वी आहे. मी माझ्या कमाईचा एक भाग भूमी फाउंडेशनला देईन जेणेकरुन या पैशाचा वापर पर्यावरणाच्या मदतीसाठी करता येईल.'

भूमी बनेल पर्यावरण रक्षक : भूमीने पुढे सांगितले की, 'एक हवामान योद्धा म्हणून, मला जागरुकता वाढवण्यासाठी, संवादाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत वातावरण तयार करण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेल. दरम्यान जेव्हा भूमी फाउंडेशन सुरू होईल, तेव्हा हवामान संरक्षक पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी मदत करेल. वाढदिवसाच्या निमित्याने भूमीने हा खास निर्णय घेवून लोकांना आणखी जागृत केले आहे. भूमीने हे पाऊल उचल्यानंतर तिचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा :

  1. Dilon Ki Doria song release : 'बवाल' चित्रपटातील वरुण धवन आणि जान्हवी कपूरवर चित्रीत 'दिलों की डोरिया' गाणे रिलीज
  2. Priyanka Chopra birthday : परिणीतीने 'मिमि दीदी' उर्फ प्रियांका चोप्रावर वाढदिवसानिमित्य केला प्रेमाचा वर्षाव
  3. Aditya And Ananya : आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे लिस्बनमधील रेस्टॉरंटमध्ये संभाषणात हरवले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.