ETV Bharat / entertainment

रांगड्या भाऊसाहेब शिंदेचा आक्रमक लुक रौंदळच्या ट्रेलरचं मुख्य आकर्षण! - भाऊसाहेब शिंदेचं आक्रमक रूप

रौंदळ हा इरसाल मराठमोळा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. या चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूझिक लॉन्च पार पडले. एका रांगड्या आणि अँग्री यंग मॅन लुकमध्ये नायक भाऊसाहेब शिंदे आकर्षक दिसत आहे.

रांगड्या भाऊसाहेब शिंदेचा आक्रमक लुक
रांगड्या भाऊसाहेब शिंदेचा आक्रमक लुक
author img

By

Published : Feb 22, 2023, 3:47 PM IST

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टी सध्या वेगाने धावू लागली आहे. अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच सिनेमांचे टिझर, ट्रेलर, संगीत लॉन्च सोहळे दणक्यात होताना दिसताहेत. 'रौंदळ' या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत लाँच हे त्यातीलच एक. मुंबईतील महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते 'रौंदळ'चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले. या ट्रेलर लॉन्चप्रसंगी रौंदळ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञमंडळी उपस्थित होते. ख्वाडा आणि बबन या चित्रपटात चमकलेला भाऊसाहेब शिंदे या चित्रपटात एका रांगड्या भबूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

ट्रेलर लॉन्चप्रसंगी रौंदळ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञमंडळी उपस्थित होते

रौंदळ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भाऊसाहेब शिंदेचं आक्रमक रूप नजर खिळवून ठेवणारं दिसत आहे. नवखी अभिनेत्री नेहा सोनावणेसोबतची भाऊची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्षवेधी ठरत आहे. अहंकाळ बाळगू नका, कारण सोन्याची लंका रावणाची होती पण अहंकारामुळे त्याचाही नाश झाला अशा आशयाची डायलॉगबाजी, अर्थपूर्ण संवाद ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. एका सर्वसामान्य रांगड्या तरुणाचा अन्यायाविरोधातील निखराचा लढा 'रौंदळ'मध्ये पहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला मिळतात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

खेड्या पाड्यातील गावगुंड राजकारण आणि त्यात पिचला जाणारा कष्टकरी शेतकरी, अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडणारा नायक, त्याची अनोखी प्रेमकहाणी, सत्यासाठीचा संघर्ष आणि लढा, संपूर्ण समाज व्यवस्थेच्याविरोधात एकटा उभा ठाकलेला निर्भय नायक, सहकारी साखर कारखान्यातील राजकारण, मंत्रमुग्ध करणारे गीत-संगीत, खरीखुरे वाटणारे अॅक्शन सीन्स, सत्तेविरोधातील युद्ध, गुन्हेगारीविरोधातील स्वत:च्या हक्कासाठीची लढाई असे बरेचसे पैलू या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

या चित्रपटातील मन बहरलं मोहरलं असेल किंवा भिलरी, ढगानं आभाळसारखी गाणी यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. ख्वाडा चित्रपटापासून नियमितपणे आशयपूर्ण गीत लिहिणारे गीतकार डॅा. विनायक पवार यांनी याही चित्रपटाची गाणी लिहिली आहे. या शिवाय बाळासाहेब शिंदे आणि सुधाकर शर्मा यांनी लिहिलेल्या मधुर गाण्यांना गायक सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार, वैशाली माडे, हर्षित अभिराज, गणेश चंदनशिवे यांच्यासारख्या दिग्गजांनी स्वरसाज चढवला आहे.

रौंदळचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतील उतरताना दिसत असून उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी नक्कीच मदतकारक ठरणारा आहे. येत्या ३ मार्च २०२३ रोजी 'रौंदळ' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एक वेगळी अनुभुती देणाऱ्या या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

हेही वाचा - Subi Suresh Passed Away : मल्याळम स्टार सुबी सुरेश यांच्या अकाली निधनाने फिल्म आणि टीव्ही जगतावर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.