ETV Bharat / entertainment

भज्जीची पत्नी गीता बसराने 6 वर्षांनंतर चित्रपटात कमबॅक करण्याची केली घोषणा - Bhajjis wife Geeta Basra

भैय्याजी सुपरहिट आणि सेकंड हँड हसबंड यांसारख्या चित्रपटांमध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री आणि क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा आगामी नोटरी या चित्रपटाद्वारे सहा वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे

भज्जीची पत्नी गीता बसरा
भज्जीची पत्नी गीता बसरा
author img

By

Published : Sep 15, 2022, 12:40 PM IST

मुंबई - भैय्याजी सुपरहिट आणि सेकंड हँड हसबंड यांसारख्या चित्रपटांमध्ये अखेरची दिसलेली अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हरभजन सिंगची ( wife of cricketer Harbhajan Singh ) पत्नी गीता बसरा ( Geeta Basra ) आगामी नोटरी ( Notary ) या चित्रपटाद्वारे सहा वर्षांनी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ती प्रख्यात बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जी यांच्यासोबत ( Bengali actor Parambrata Chatterjee ) भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन वडेयर यांनी केले असून ऑक्टोबरपासून याचे शुटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

गीता बसरा ही प्रेग्नंसीच्या सुट्टीवर होती आणि दुबईमध्ये तिच्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत होती. यावेळी ती म्हणाली होती, ''ही एक अविश्वसनीय ट्रिप होती, आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. भज्जीच्या बिझी वेळापत्रकामुळे आणि हिनायाच्या शाळेमुळे मला अभिनय फार कमी वेळा करायला मिळतो आणि आता आगामी चित्रपटात अशी संधी कधी मिळेल हे माहीत नाही.''

"हिनायाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही, मी शूटिंग करणार आहे, त्यामुळे या पाच दिवसांच्या सुट्ट्यांसह, मी एक ठरवले होते की आम्ही कौटुंबिक सुट्टीवर जाऊ आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतला."

गीताने ऑक्टोबर 2015 मध्ये पंजाबमध्ये भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी हिनाया हीर प्लाहा ( Hinaya Heer Plaha ) आणि मुलगा जोवन वीर सिंग प्लाहा ( Jovan Veer Singh Plaha ) आहे.

हेही वाचा - आलियाने रणबीर कपूरची पब्लिकमध्ये घेतली काळजी, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.