मुंबई - कॉमेडियन भारती सिंग, तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि त्यांचा मुलगा गोल ( ज्याचे खरे नाव लक्ष लिंबाचिया आहे ) बिग बॉस 16 च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. यात ते बॉलिवूड स्टार सलमान खानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहेत.
स्टेजवर आल्यानंतर, भारती सलमान खानचे वचन आठवते: "सारे वादे याद है सलमान भाई के. इन्होने कहा था की इंके बचे को में लॉन्च करूंगा. पुढे जाऊन भारती तिचा मुलगा लक्षला स्टेजवर आणते आणि सलमानकडे देते. बराच वेळ कडेवर घेतल्याने त्रास होतोय असे म्हणून ती मुलाला सलमानकडे देते. सलमानही बाळाला आपल्या कडेवर घेतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सलमान म्हणतो, "साहजिकच थकोगी यार...नंतर, सलमान त्याचे ट्रेडमार्क चांदीचे ब्रेसलेट आणि हर्षला विशेष लोहरी भेट देतो. भारती नंतर सलमानने त्याचे पनवेल फार्महाऊस रिकामे केल्याबद्दल विनोद केला कारण त्याने फार्महाऊस तिचा मुलगा लक्षकडे हस्तांतरित केला आहे, असे भारती म्हणताच सलमान हसायला लागतो.
होस्ट सलमानशी बोलल्यानंतर, भारती आणि हर्ष लक्षला सलमानसोबत सोडतात आणि ते सर्व स्पर्धकांना भेटण्यासाठी बिग बॉस 16 च्या घरात जातात. भारती नंतर सांगते की साजिद खान आणि अब्दू रोजिक यांच्या पहिल्या महिन्याच्या मैत्रीबद्दल बाहेरचे सर्वजण गोंधळले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
भारती म्हणते "साजिदला अब्दूची मम्मी वाटत होती" भारती पुढे बोलते की टीना दत्ता तिची बिग बॉस 16 च्या घरातील सर्वात जुनी मैत्रीण आहे. भारती टीनाला मिठी मारण्यासाठी पुढे जाते पण टीनाच्या आईची नक्कल करत अर्चनाला मिठी मारते.
दरम्यान, भारती आणि हर्ष यांचा मुलगा 3 जानेवारीला नऊ महिन्यांचा झाला. तिने चाहत्यांसह हा प्रसंग साजरा करण्यासाठी काही फोटो शेअर केले. या जोडप्याने 3 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे, स्वागत केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
टीव्ही होस्ट हर्ष लिंबाचिया आणि कॉमेडियन भारती सिंग अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलाचे गोंडस व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. नुकताच हर्षने त्याला लाडक्या लक्षने पहिल्यांदा पापा हा शब्द उच्चरला त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. यामुळे भारती लक्षला उचलून घेते आणि त्याला पापा म्हण असे सांगते. मागो माग लक्षही पापा हा शब्द उच्चरतो. त्याचे हे गोड बोल ऐकूण हर्ष आणि भारतीच्या आनंदाला पारावर उरत नाही.