मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट हा रूपेरी पडद्यावर चांगलाच गाजत आहे. चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये आणखी गर्दी वाढतच आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक इतिहास रचला आहे. २४ व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३.२५ कोटीची कमाई केली आहे. आता चित्रपटाचे आता एकूण कलेक्शन ६५.६९ कोटीवर पोहचले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालिची कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन चार आठवडे झाले आहेत. तरी हा चित्रपट आपली जादू प्रेक्षकांवर चालवतच आहे.
१०० कोटीच्या कल्बमध्ये पोहचेल : 'बाईपण भारी देवा' चित्रपटामधील गाणे खूप हिट झाले आहेत. आता सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत खूप चर्चा होत आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात हिरो नसतानाही चित्रपटाने यशाचे डोंगर गाठले आहे, त्यामुळे या चित्रपटाचे खूप कौतुक चित्रपटसृष्टीत होत आहे. हा चित्रपट फक्त ५ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० पटीने जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट भारतात नाही तर जगभरात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह ५ देशामध्ये प्रदर्शित झाला आहेत. भारतात हा चित्रपट आता देखील तुफान कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटीच्या कल्बमध्ये सामील होणार अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत.
चित्रपटाची कहाणी : या चित्रपटाची कहाणी ६ बहिणीवर आधारित आहे. एकमेंकापासून दूरावलेल्या बहिणी मंगळागौरीच्या निमित्याने पुन्हा एकत्र येतात. त्यानंतर या बहिणी एका स्पर्धेत भाग घेतात, या स्पर्धेला जिंकण्यासाठी या बहिणी खूप प्रयत्न करतात, आयुष्याच्या धकाधकिच्या जीवनातून या स्वत:साठी वेळ काढतात, हा वेळ काढत असताना त्यांना किती अडचणीचा सामना करावा लागतो, हे या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये केदार शिंदे यांनी प्रत्येक महिलेची कहाणी योग्य रित्या मांडली आहे. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्यासाठी जास्त प्रमाणात महिला वर्ग जात आहेत.
हेही वाचा :