ETV Bharat / entertainment

Baipan bhari deva IMDB rating : 'बाईपण भारी देवा'च्या रेटिंगने 'पठाण'ला मागे टाकले, कमाईचे आकडे पाहून जग अचंबित - सुकन्या मोने

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने आयएमडीबी रेंटिंगमध्ये पठाण या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. या चित्रपटाबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

Baipan bhari deva
बाईपण भारी देवा
author img

By

Published : Jul 15, 2023, 12:19 PM IST

मुंबई : बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात पूर्णतः यशस्वी झालाय. महिला प्रेक्षकांना डोळ्या समोर ठेवून बनवलेला हा चित्रपट सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या कमाईचे आकडे ट्रेड पंडितांना चक्रावून टाकणारे आहेत. पहिल्या दिवशी सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी ही कमाई वाढत गेली. विशेष म्हणजे १५ व्या दिवशी चित्रपटाने २.६० कोटीची कमाई केली. आजपर्यंत चित्रपटाची एकूण कमाई ३९.९५ कोटी झाल्याने मराठी चित्रपट निर्माते, प्रेक्षक आणि व्यापार विश्लेषक अचंबित झाले आहेत.

रेटिंगमध्ये 'पठाण' चित्रपटाला मागे टाकले : शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाला मागे टाकत 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पठाण या चित्रपटाने देशभरात १००० कोटीचा टप्पा पार केला होता. या चित्रपटाचे जगभरात खूप नाव झाले होते. याशिवाय या चित्रपटाने देशांतर्गत चांगलीच कमाई केली होती, आणि चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला होता. आयएमडीबीवर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला ५.९ इतकी आयएमडीबी रेटिंग मिळाले होते. तसेच 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.८ इतके रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे आयएमडीबी रेटिंगमध्ये 'पठाण'वर 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट भारी पडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहे तरी या चित्रपटाचा क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटाला बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहे.

चित्रपटाचे शो हाऊसफुल : या चित्रपटाचे शो हाऊसफुल मिळत आहे. अवघ्या ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने १५ दिवसांत देशांतर्गत एकूण ३९.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसेच दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने २.६० कोटी कमाविले आहेत. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सातपट नफा कमावला आहे. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कहाणी सहा बहिणींच्या आयुष्याभोवती फिरणारी आहे.

हेही वाचा :

  1. Baipan Bhari Deva : बाईपण भारी देवाने रचला इतिहास, दुसऱ्या आठवड्यात कमाईने गाठली ९८ टक्केंची उंच उडी
  2. Kareena's Italy diary : करीनाने पोस्ट केले नयनरम्य फोटो, एकाच फ्रेममध्ये दिसले निसर्गासह तिचे सौंदर्य
  3. Bawaal song Dil Se Dil Tak: वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल' चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.